junagadh hate speech case: घाटकोपरमधून मौलाना अझहरीला घेतले ताब्यात, तणाव, लाठीचार्ज अन्..

रोहित गोळे

• 09:42 PM • 04 Feb 2024

Maulana salman azhari detained: मुफ्ती सुलमान अजहरी याला घाटकोपरमधून ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने अचानक चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

gujarat ats detained maulana mufti azhari from ghatkopar in junagadh hate speech case created ruckus police lathicharged

gujarat ats detained maulana mufti azhari from ghatkopar in junagadh hate speech case created ruckus police lathicharged

follow google news

Maulana salman azhari hate Speech Case: मुंबई: इस्लामिक धर्मगुरू मौलाना मुफ्ती सुल्मान अजहरी याला मुंबईतील घाटकोपर भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतल्यानंतर मौलानाची गुजरात पोलिसांनी चौकशी केली. मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात ही चौकशी सुरू आहे. वास्तविक, मुफ्ती मौलाना सलमान अजहरी याने 31 जानेवारीला गुजरातमधील जुनागडमध्ये द्वेषपूर्ण भाषण दिले होते. ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जुनागड पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला होता. हा धार्मिक कार्यक्रम असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी, मुफ्ती सलमाने त्यादरम्यान द्वेषपूर्ण भाषण केलं होतं. (gujarat ats detained maulana mufti azhari from ghatkopar in junagadh hate speech case created ruckus police lathicharged)

हे वाचलं का?

यानंतर मुफ्ती सलमान अजहरी याच्यासह आयोजक युसूफ मलेक आणि अझीम हबीब यांच्याविरुद्ध कलम 153 अ, 505, 188,114 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर युसूफ आणि हबीबला अटक करण्यात आली.

मुफ्ती यांच्या समर्थकांनी केली निदर्शने

मुफ्ती सुलमान अजहरी यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी निदर्शने सुरू केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला, त्यामुळे अचानक चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. चौकशी आणि कागदोपत्री कारवाई करूनही गुजरात पोलिसांचे पथक घाटकोपर पोलिस ठाण्यात अनेक तास बसून असल्याचे सांगण्यात येत आहे. मुफ्ती यांना गुजरातमधील जुनागढ येथे न्यायचे आहे, मात्र, गर्दीमुळे पोलिसांना त्यांना तिथे नेणे शक्य होत नाही.

जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. आधी प्रसारमाध्यमांना प्रथम पोलीस ठाण्यापासून दूर नेण्यात आले आणि त्यानंतर अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला. जमावाला पांगवण्यासाठी तो तैनात होता. पण जमाव हलायला तयार नव्हता. शेवटी बळाचा वापर करण्यात आला, त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

हे ही वाचा>> भाऊच भावाच्या जीवावर उठला, 9 वर्षाच्या भावाला डोकं फोडून का संपवलं?

मौलाना पोलीस कोठडीत

मौलाना अजहरी याचा शोध जेव्हा सुरू केला तेव्हा तो मुंबईत असल्याची माहिती मिळाली. जुनागडचे एसपी आणि घाटकोपर परिसरातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएसच्या टीमने लोकेशन ट्रॅक केले आणि शनिवारीच एक टीम मुंबईला रवाना झाली, त्यानंतर मौलाना सलमानला अखेर रविवारी दुपारी गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि घाटकोपरमधील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं.

येथे कागदोपत्री काम करावे लागणार होते, मात्र, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच मोठ्या संख्येने मुस्लीम समाजाचे लोक घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. त्यामुळे या संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मौलाना अजहरीची चौकशी

मागील अनेक तासापासून मौलानाची चौकशी सुरू आहे. मुफ्ती अजूनही कोठडीत आहेत. सूत्रांनुसार, पोलीस आज रात्री उशिरा त्याला गुजरातला घेऊन जाऊ शकतात. गुजरात एटीएसचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एफआयआरनंतर जिल्हा एसपींनी 2 जणांना अटक केली आहे.

हे ही वाचा>> Ganpat Gaikwad : गोळ्या झाडणाऱ्या भाजप आमदाराच्या मुलासोबत काय घडलं, पहा Video

मुफ्तीचा शोध देखील सुरू होता. सध्या त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. त्याने वादग्रस्त भाषण का केले? त्याबाबत चौकशी करावी लागेल. त्याचा हेतू काय होता? लोकांना भडकवायचे होते का? असे अनेक प्रश्न त्याला विचारण्यात येत आहे. यामुळे वातावरण बिघडून कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते. ही बाब लक्षात घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात येत आहे.

    follow whatsapp