Gujarat Rich Thief : गुजरातमधील एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. वापीत एक लाख रुपये चोरीच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. या अटकेनंतर आरोपीच्या चौकशीत ज्या गोष्टींच्या उलगडा झाला आहे, त्या पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण आरोपीचा क्रिमिनल रेकॉर्ड आणि लाईफस्टाईल पाहून पोलिसांनाच धक्का बसला आहे. नेमका हा आरोपी कोण आहे? आणि त्याची लाईफस्टाईल नेमकी कशी आहे? हे जाणून घेऊयात. (gujarat rich thief who drove audi car live in mumbai 1 crore flat wapi valsad police)
ADVERTISEMENT
गेल्या महिन्यात गुजरातच्या वापीत एक लाख रूपये चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी रोहित कनुभाई सोळंकी या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीची चौकशी केली असता तो आलिशान हॉटेलमध्ये राहायचा आणि विमानाने प्रवास करायचा, अशाप्रकारे लक्झरी लाईफ जगत असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी रोहित सोलंकी याने अनेक राज्यात चोरी केली आहे. या चोरीच्या पैशातून तो लक्झरी लाईफ जगत असल्याचीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपी रोहितने 19 चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये वलसाडमध्ये तीन, सुरतमध्ये एक, पोरबंदरमध्ये एक, सेलवालमध्ये एक, तेलंगणामध्ये दोन, आंध्र प्रदेशमध्ये दोन, मध्य प्रदेशमध्ये दोन आणि महाराष्ट्रात एक घटना घडली आहे.
हे ही वाचा : Budget 2024: मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला, अर्थमंत्री 'या' दिवशी सादर करणार
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आणखी सहा चोरी केल्याची कबुली रोहितने दिली आहे. त्याला अनेक राज्यांतील गुन्हेगारीचा इतिहास आहे. इतकचं नाही तर रोहित सोलंकीने मुस्लिम महिलेशी लग्न करण्यासाठी आपले नाव बदलून अरहान ठेवल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मुंबईत 1 कोटीचं घर
मुंबईतील मुंब्रा परिसरात रोहित सोलंकीचं एक कोटी रुपयांहून अधिक किमतीच आलिशान घर असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या आलिशान कारमध्ये आरोपी राहतो. त्याच्याजवळ एक ऑडीकार असल्याची माहिती आहे.
रोहित आलिशान हॉटेलमध्ये राहायचा, फ्लाइटमधून प्रवास करायचा आणि हॉटेल्समध्ये चोरी करण्यासाठी कॅब बुक करायचा. चोरी करण्यापूर्वी तो दिवसा सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करत असे, अशी माहिती वलसाड पोलिसांनी दिली आहे. तसेच रोहितला मुंबईतील डान्स बार आणि नाईट क्लबमध्ये पार्टी करायचीही आवड आहे. त्याला ड्रग्जचे देखील व्यसन आहे. महिन्याला तो 1.50 लाख रुपये खर्च करतो, अशी माहिती देखील वलसाड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान चोराची ही लक्झरी लाईफस्टाईल पाहुन पोलीस चक्रावले आहेत.
ADVERTISEMENT