Former mla Nafe Singh Rathee shot dead : इंडियन नॅशनल लोक दलाचे (INLD) प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नफे सिंग राठी यांची हरियाणातील बहादूरगडमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड येथे रविवारी ही घटना घडली आहे. माजी आमदार राठी त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर त्याना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. haryana inld chief former mla nafe singh rathee shot dead in jhajjar bahadurgarh
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार राठी यांना गेल्या काही दिवसापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. यासाठी सरकारकडे सुरक्षेचीही मागणी करण्यात आली होती. मात्र सुरक्षा पुरवली गेली नव्हती. त्यात आज रविवारी आमदार राठी त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून प्रवास करत होते. यावेळी आय10 कारमध्ये बसलेले हल्लेखोर त्यांचा पाठलाग करत होते. या दरम्यान आमदार राठी यांचे वाहन बाराही गेटजवळ पोहोचताच त्यांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी किमान 40-50 राऊंड गोळीबार केल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा : Manoj Jarange : 'जरांगेंमागे शरद पवार, टोपेंचा हात, पोलिसांवर दगडफेकही...'
गोळीबाराच्या या घटनेत चार जण जखमी झाले होते. यातील दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी आहेत. यावर डॉक्टर मनीष शर्मा यांनी सांगितले, जखमींपैकी दोन जणांचे रक्त वाहून गेले होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता. दोन जखमींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या खांद्यावर आणि मांडीवर गोळ्या लागल्या होत्या. मृतांमध्ये माजी आमदार नफे सिंग आणि त्यांचे सुरक्षा रक्षक जय किशन यांचा समावेश आहे.
आमदार राठी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी दोन डीएसपींच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले आहे. सर्व बाजूंनी तपास केला जाईल. जिल्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करणार असून एफआयआर नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे. सीआयए आणि एसटीएफची टीम काम करत असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे झज्जरचे एसपी अर्पित जैन यांनी सांगितले.
ADVERTISEMENT