अयोध्या: अयोध्येत एका वधू-वराच्या मृत्यूच्या गूढ प्रकरणी पोलीस पूर्णपणे बुचकळ्यात पडले आहेत. एका बाजूला, वधू आणि वर त्यांच्या लग्नाची पहिली रात्र साजरी करण्यासाठी जातात आणि दुसऱ्या बाजूला, कुटुंब त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी रिसेप्शन पार्टीची तयारी सुरू करतात. पण कोणाला ही कल्पनाही नव्हती की, सकाळी दार उघडल्यावर, थेट या नव्या जोडप्याचे मृतदेहच सापडतील. पण दुर्दैवाने असं झालं खरं.. ज्यानंतर आता या प्रकरणाचं गूढ हे दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, चौकशीदरम्यान असे दिसून आले की, लग्नानंतर वर प्रदीप आणि वधू शिवानी हे खूप आनंदी होते. ते तासनतास फोनवर बोलत असे. त्यांनी लग्नात एकत्र डान्सही केला होता. माहेरकडील लोकांचा निरोप घेऊन नववधू शिवानी ही घरी आली. लग्नाच्या रात्री नवरदेव प्रदीप हा साधारण रात्री 12 वाजेच्या सुमारास शिवानीच्या खोलीत गेला. पण त्या 3 तासांत खोलीत असं काय घडलं की, पहाटे 3 वाजता दोघांचाही मृत्यू झाला.
हे ही वाचा>> लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी खोलीत गेले, सकाळी कुटुंबानं दार तोडल्यावर दोघांचे मृतदेह सापडले... थरारक घटनेनं सगळे हादरलं
प्रदीपच्या मोबाइलवर आलेल्या मेसेजवरून ठरणार तपासाची दिशा
पोलिसांचा तपास लग्नाच्या रात्री प्रदीपच्या मोबाइल फोनवर आलेल्या मेसेजवर केंद्रित आहे. हे नेमकं कोणी केलं? शेवटी मेसेजमध्ये काय होतं? ज्या व्यक्तीने मेसेज पाठवला त्याला शिवानीचा पती प्रदीपचा नंबर कसा मिळाला? त्याने या मसेजसाठी लग्नाचीच रात्र का निवडली? त्या मेसेजमध्ये असे काही होते का ज्यामुळे प्रदीपने टोकाचं पाऊल उचललं? प्रदीपने पत्नीचा गळा दाबला आणि नंतर स्वतःला गळफास लावून आत्महत्या का केली? असे अनेक सवाल हे आता पोलिसांसमोर आहेत.
हा एक सुनियोजित कट होता का?
जर प्रदीपने त्याची पत्नी शिवानीची हत्या केली असेल तर त्याने पळून जाण्याऐवजी आत्महत्या का केली? यावरही पोलीस काम करत आहेत. हा एक सुनियोजित कट होता की ते सर्व त्या रात्री अचानक घडले? कुटुंबातील सदस्यांना त्या मेसेज माहिती का देण्यात आली नाही? मेसेज पाठवणाऱ्याला नेमके काय हवे होते?
हे ही वाचा>> संतोष देशमुखांच्या हत्येचा जिथे कट रचला, तिथल्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब आला समोर, वाचून तुम्हीही जाल हादरून!
सूत्रांवर माहितीनुसार, महत्त्वाचा पुरावा असलेला तो मेसेज पोलिसांच्या हाती लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृत प्रदीपच्या मोबाइलचा सीडीआर मिळवला आहे. दरम्यान, अयोध्या छावणीचे प्रभारी पंकज सिंह म्हणतात की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पुरावे गोळा केले जात आहेत. लवकरच हे प्रकरण उघड होईल.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण सहदतगंजमधील मुरावन गावातील प्रदीप कुमारचे आहे. ज्याचे लग्न 7 मार्च रोजी खंडासाच्या शिवानीशी झाले होते. 8 तारखेला तिची पाठवणी झाल्यानंतर ती पती प्रदीपसोबत सासरी आली. 8 मार्चच्या रात्री, वधू आणि वर त्यांच्या लग्नाची रात्र साजरी करण्यासाठी खोलीत गेले. त्याआधी घरातले सगळे आनंदी होते.
सकाळी 6 वाजता दारावर थाप पडली. तेव्हा आतून कोणीही दार उघडले नाही तेव्हा कुटुंबाला वाटले की, ते दोघेही झोपले असतील आणि थोड्या वेळाने जागे होतील. 7 वाजता पुन्हा एकदा दार ठोठावण्यात आलं. पण तरीही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. ज्यानंतर घरातील लोकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यांनी पुढे काही वेळ दरवाजा सलग ठोठावला. पण तरीही आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कुटुंबातील काही लोकांनी खिडकीतून आत वाकून पाहिलं. पण आतलं दृश्य पाहून ते हादरून गेले.
कारण त्यावेळी त्यांना प्रदीप पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. ज्यानंतर घरातील लोकांनी तात्काळ खोलीचा दरवाजा तोडला. जेव्हा दरवाजा तोडला गेला तेव्हा शिवानीचा मृतदेह हा बेडवर पडला होता. तर प्रदीप हा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आला. त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
ADVERTISEMENT
