देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.या वाढत्या घटनांमुळे गुन्हयाचे प्रमाण देखील वाढले आहे. आता बिहारच्या मुजफ्फरनगरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका जवानाने अनैतिक संबंधाला विरोध केल्याने आपल्याच बायकोला आणि दोन महिन्याचा बाळाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आई आणि बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाली असून घटनेचा तपास सुरू आहे. (husband killed wife and two months baby illicit relation bihar muzaffarpur case crime)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या मुजफ्फरनगरमध्ये राहणाऱ्या मृत महिलेचे नाव सोनल प्रिया (30) आहे. तिच्या दोन महिन्याच्या बाळाचा देखील या घटनेत मृत्यू झाला. महिलेचा भाऊ प्रकाश कुंज यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. या घटनेनंतर सोनलच्या सासरचे कुटुंब फरार झाले आहेत. तसेच पोलिसांनी आरोपी पतीचा आणि त्याचा कुटुंबियांचा शोध सुरु केला आहे.
मृत महिलेचा भाऊ प्रकाश कुंजने दिलेल्या माहितीनुसार, माझे बहिणीच्या सासरच्या घरापासून जवळच आहे. मृत सोनलचे लग्न 10 वर्षापुर्वी हिमांशुसोबत झाले होते. लग्ना दरम्यान हिमांशु हा बेरोजगार होता. तर त्याच्या संपूर्ण घराचा खर्च त्याचे वडील आणि भाऊ उचलायचा. लग्नानंतर हिमांशूची सैन्यात नोकरी लागली आणि राजस्थानच्या जोधपूरमध्ये पोस्टींग लागली होती.
हे ही वाचा : Crime : इंस्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बलात्कार अन्…, अल्पवयीन मुलीसोबत भयानक घटना
गेल्या बुधवारीच हिमांशु सुट्टी काढून घरी आला होता. या दरम्यान रात्री 8 वाजताच्या भाची घरी आली आणि दार ठोठावू लागली. यावेळी दरवाजा उघडताच तिने म्हटले, आईला बाबांनी जाळले. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी लगेच बहिणीच्या घराकडे धाव घेतली. यावेळी त्यांची खोली बंद होती. यानंतर कसा बसा दरवाजा उघडला तेव्हा दोघेही जमीनीवर पडले होते. त्वरीत दोघांना आम्ही रूग्णालयात दाखल केले, यावेळी दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
प्रकाशने आरोप केला की, हिमांशुची ज्यावेळेस नोकरी लागली त्यावेळेस त्याने आमच्याकडून 10 हजाराचा हुंडा मागितला. आणि हुंडा न दिल्यास मारहाण सुरू केली. काही काळानंतर आम्हाला कळालं की, बॅकेत कार्यरत असलेल्या एका तरूणीसोबत त्यांचे प्रेमप्रसंग होते. ही मुलगी देवरीया ठाणे क्षेत्रात राहणारी आहे. हिमांशुला तिच्याशी दुसरे लग्न करायचे होते. पण सोनमचा या लग्नाचा विरोध होता.
दरम्यान आता या अनैतिक संबंधातून सोनम आणि तिच्या बाळाची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT