Crime news Marathi : आधी हुंड्यासाठी छळ केल्यानंतर मुंबईत आणून पत्नीला विकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रायबरेलीतील देह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, ही घटना मुंबईत घडली आहे. वेश्या बनण्यासाठी पती आणि सासरच्यांनी जबरदस्ती केल्याचा आरोपही विवाहित महिलेने केला आहे.
ADVERTISEMENT
देह येथील एका मुस्लिम महिलेने तिच्या पतीवर तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आणि तिच्या सहा महिन्यांच्या मुलाला बळजबरीने पळवून नेल्याचा आरोप केला आहे. पीडितेने सासू, सासरे यांच्यासह आठ जणांविरुद्ध तक्रार पोलिसांना दिली आहे. पोलीस स्टेशनचे प्रमुख आलोक प्रियदर्शी यांनी या प्रकरणाचा तपास देह पोलीस अधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांच्याकडे सोपवला आहे.
हेही वाचा >> Darasha Pawar : राहुल हंडोरे दर्शनाचा नातेवाईक होता का? ओळख झाली तरी कशी?
पीडितेचा विवाह 7 सप्टेंबर 2021 रोजी प्रतापगड येथील लालगंज आजरा येथे राहणाऱ्या तरुणाशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस नवऱ्याच्या घरात सगळं सुरळीत होतं. मात्र त्यानंतर त्यांच्याकडून पीडितेकडे हुंड्याची मागणी करण्यात आली. मात्र, ही बाब त्यांच्या माहेरच्या घरी कळताच त्यांनी मुलाच्या घरच्यांशी चर्चा केली. त्यानंतर पीडितेचा छळ थांबला.
नंतर मुंबईत आले आणि…
त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये ती पती आणि सासू सासऱ्यांसह मुंबईत राहायला गेली. तेथे गेल्यानंतर तिला कळले की तिच्या नवऱ्याचे आधीच लग्न झालेले आहे आणि या प्रकरणी त्याच्यावर केसही सुरू आहे. याबद्दल पीडित महिलेने विचारणा केली असता पती, सासू, भावजय आणि वहिनी यांनी तिला मारहाण केली.
हेही वाचा >> Titanic जहाज नेमकं कसं बुडालेलं?, अंगावर काटा आणणारा 111 वर्षांपूर्वीचा इतिहास!
तिचा नवरा तिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करत असे आणि रोज रात्री तिला घराबाहेर टाकत असे. मात्र महिलेने कुठेही न जाता घराजवळच रात्र काढली. इतकेच नव्हे तर पीडितेच्या आरोपानुसार तिच्या पतीने तिला विकलेही होते. पण, ती कशीबशी सुटका करून परत आली.
पत्नीला विकले, मुलाला घराबाहेर फेकले
ती सकाळी घरी आली असता सासरच्यांनी तिला बेदम मारहाण केली. पीडितेने सांगितले की, 15 जून रोजी तिच्या पतीने तिला कुणाला तरी विकले होते. आणि माझ्या सहा महिन्यांच्या बाळाला मध्यरात्री उचलून नेले. एवढेच नाही तर तिच्या निर्दयी पतीने मुलालाही घराबाहेर फेकले.
हेही वाचा >> Patna : 17 पक्ष, अजेंडा आणि… विरोधकांसमोर आहेत ‘ही’ मोठी आव्हानं
सासरच्यांनी घरातून हाकलून दिल्यानंतर ती कशीतरी तिच्या माहेरच्या घरी आली आणि तिने आई-वडिलांना झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मंगळवारी पीडितेच्या नातेवाईकांनी तिला पोलीस ठाण्यात नेले. पीडितेने तिच्यावर होत असलेल्या छळाची तक्रार पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.
ADVERTISEMENT