Uttar Pradesh Crime: तरुणाबाबतची ही घटना महिलेला समजल्यानंतर मात्र विवाहित महिलेने मुलाच्या कुटुंबीयांकडे तक्रार केली. त्यानंतर घडलं उलटचं, कारण तक्रार केल्यानंतर त्या महिलेलाच सासरच्या मंडळींकडून मारहाण (Beaten) करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र त्या विवाहितेने सासरच्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे आता पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीसह 5 जणांविरुद्ध हुंडाबळी आणि कौटुंबीक छळ (Domestic violence) केल्याच्या गुन्हाखाली गुन्हा नोंद केला आहे.
ADVERTISEMENT
हुंडा 35 लाखाचा
पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, खगा कोतवाली भागातील कसबामध्य राहणाऱ्या महिलेचा 29 मे 2021 रोजी कोतवालीतील सुरेंद्र कुमार जयस्वाल यांचा मुलगा मनीष कुमार जयस्वाल याच्याबरोबर तिचा विवाह झाला होता. त्यावेळी महिलेच्या वडिलांनी लग्नासाठी देणगी, हुंडा आणि इतर खर्चासह 34 लाख रुपये लग्नात खर्च केले होते.
वैवाहिक सुख नाही
पीडित महिलेनं सांगितले की, ती जेव्हा माहेर सोडून सासरी आली. त्यावेळी मात्र तिला घरातील कोणत्याही व्यक्तीने तिच्याबरोबर चांगली वागणूक दिली नाही. पीडितेने अशीही तक्रार केली आहे की, तिच्या नवऱ्याने तिला वैवाहिक सुखही दिले नाही. तिच्या आयुष्यात घडलेल्या घटना तिने जेव्हा आपल्या आई वडिलांनी सांगितली तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिला सर्व काही ठीक होईल असा विश्वास देऊन तिला पुन्हा त्यांनी सासरी पाठवले होते.
हे ही वाचा >> देशमुख-शिंदेही देणार धक्का?, बावनकुळेंचं मोठं विधान
शिवीगाळ आणि मारहाण
ती माहेरूवरून सासरी आल्यानंतर त्या लोकांनीही त्यांनी तिच्या आई वडिलांना तुम्ही मुलीची काही काळजी करू नका असं सांगितलं. मात्र तिचे आई वडील निघून गेल्यानंतर तिच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी तिच्या सासू, सासरा आणि दीराकडूनही तिला शिवीगाळ करून तिला मारहाण करण्यात आली.
नवऱ्यानं स्पष्टच सांगितलं
ती जेव्हा सासरी गेली त्यावेळी पती आणि पत्नी दोघंही बाहेर गेली होती. त्यावेळी तिच्या नवऱ्याने तिला वाटेत अडवून तिला एक गोष्ट संगितली ती ऐकून मात्र तिच्य पायाखालची वाळूच सरकली. त्याने सांगितले की, मी तुला फसवले आहे, मला तुझ्यापासून घटस्फोट पाहिजे. मला माझ्या काकांच्या आणि आई वडिलांच्या दबावामुळे तुझ्याबरोबर लग्न करावे लागले. मात्र मी गे म्हणजेच समलैंगिक असून मला तू घटस्फोट दे असं सांगितल्यानंतर तिला मोठा मानसिक धक्काच बसला.
तुमचा मुलगा समलैंगिक
ज्यावेळी तिच्या नवऱ्याने तो समलैंगिक असल्याचे तिला सांगितले त्यानंतर तिनेही ही गोष्ट सासरच्या लोकांनाही तिने सांगितली. तुमचा मुलगा समलैंगिक आहे, तो गे असल्याचे सांगितल्यानंतर तिला सासरच्या लोकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ही गोष्ट तिने आपल्या भावाला सांगितल्यानंतर त्यानेही तिला माहेरी आणले आणि त्यानंतर तिने जाऊन सासरच्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनीही आता सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरु केला.
ADVERTISEMENT