कर्नाटकच्या बेळगाव (belgaum) जिल्ह्यात एका जैन मुनीची (jain seer) हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामकुमार नंदी महाराज असे या जैन मुनी यांचे नाव होते. तर जैन मुनी बुधवारपासून बेपत्ता होते. यानंतर जैन मुनी यांच्या भक्तांनी कामकुमार नंदी महाराज बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत पोलिसांच्या हाती एक संशयीत लागला आहे. या संशयीताने, जैन मुनी यांची हत्या करून मृतदेह फेकून दिल्याची कबूली दिली आहे. या हत्या प्रकरणात संशयीतासोबत आणखीण एका व्यक्तीचाही सहभाग होता. पोलिसांनी या दोघांना आता ताब्यात घेतले आहे. (jain seer kamakumara nandi maharaj killed in belgaum karnataka crime story)
ADVERTISEMENT
मीडिया रिपोर्टनुसार, चिक्कोडी तालुक्यातील हिरकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमात आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज गेल्या साधारण 15 वर्षापासून राहत होते. गेल्या बुधवारी कामकुमार नंदी महाराज अचानक बेपत्ता झाले. या प्रकरणी गुरुवारी आचार्य कामकुमारनंदी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमप्पा उगार यांनी पोलीस ठाण्यात जैन मुनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर चिक्कोडी पोलिसांनी तक्रार दाखल करून चौकशीला सुरुवात केली होती. या चौकशीत पोलिसांनी संशयाच्या आधारावर दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत कामकुमार नंदी महाराज यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांनी जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे.
हे ही वाचा : Crime : ‘सॉरी जान.. 2 दिवस उशीर झाला’, फोटो शेअर केला अन् नवविवाहितेने…
आरोपींचा खळबळजनक खुलासा
पोलीस चौकशीत आरोपींनी मोठा खुलासा केला आहे. जैन मुनी कामकुमार नंदी महाराज यांची हत्या केली आहे, तसेच त्यांचा मृतदेह फेकुन दिल्याची खळबळजनक माहिती दिली आहे. जैन मुनी यांचा मृतदेह कटकाबावी गावच्या नजीक तुकडे तुकजे करून फेकल्याची माहिती आहे.तर दुसरीकडे जैन मुनींचा मृतदेह कपड्यात लपेटून नदीत वाहून टाकला आहे. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी शुक्रवारी कटकाबावी गावात सर्च अभियान राबवायला सुरुवात केली आहे. दरम्यान आज शनिवारी देखील मृतदेहाचा शोध सुरू होता.
या प्रकरणावर आता पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी जैन मुनींचे अपहरण आणि हत्येची घटना कबुल केली आहे. हिरकोडी गावातील नंदी पर्वत आश्रमात सध्या शांततेचे वातावरण आहे.तसेच खबरदारी म्हणून गावात मोठा पोलिस बदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT