Kalyan : नवरा शारीरिक सुख देत नाही, पत्नीची पोलिसात धाव; कल्याणमधील धक्कादायक प्रकार

मिथिलेश गुप्ता

31 Jan 2024 (अपडेटेड: 31 Jan 2024, 12:49 PM)

लग्नाच्या काही महिन्यानंतर नवरा विचित्रच वागत होता. नवऱ्याच्या या वागण्याला कंटाळून महिलेने घऱ सोडून दिले होते आणि ती माहेरी निघून गेली होती. त्यानंतर पुन्हा तिला सासरच्यांनी समजावल्यानंतर ती घरी परतली होती.

kalyan news husband does not give physical pleasure womene file complaint khadakpada police shocking story

kalyan news husband does not give physical pleasure womene file complaint khadakpada police shocking story

follow google news

Kalyan News :  कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या महिलेने ‘पती शारीरिक सुख देत नाही’. तसेच तो नपुंसक असल्याचा आरोप करत खडकपाडा पोलीस (Khadakpada Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार महिलेच्या पतीविरोधात (Husband) विश्वासघात आणि फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा तपास पोलीस (Police) करीत आहेत. kalyan news husband does not give physical pleasure womene file complaint khadakpada police shocking story)

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे (Thane) जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुर्गम गावात राहत असलेल्या एका 32 वर्षीय महिलेचे शहाडच्या 40 वर्षीय तरूणासोबत लग्न झाले होते.या दोघांचे लग्न गेल्यावर्षी जून महिन्यात झाले होते. या लग्नाआधी मुलीकडच्या मंडळींनी मुलाचे लग्न इतक्या उशीरा का होतेय, असा सवाल केला होता. मात्र त्यावेळेस मुलाने सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असल्याचे कारण दिले होते. त्यावेळेस पती चांगला शिकलेला असल्यामुळे महिलेला तो आवडला होता.म्हणूनच तिने त्याला होकार दिला होता. त्यानुसार दोघांचेही लग्न थाटामाटात पार पडले होते.

हे ही वाचा : Maratha Reservation: जरांगे भुजबळांवर भडकले, ‘तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तू…’

दरम्यान लग्नाच्या काही महिन्यानंतर नवरा विचित्रच वागत होता. नवऱ्याच्या या वागण्याला कंटाळून महिलेने घऱ सोडून दिले होते आणि ती माहेरी निघून गेली होती. त्यानंतर पुन्हा तिला सासरच्यांनी समजावल्यानंतर ती घरी परतली होती. घरी परतल्यानंतर महिलेला तिच्या पतीमधला दोष स्पष्टपणे दिसून आला. कारण डॉक्टरांकडून तो कोणती तरी औषध घेत होता. यावेळी महिलेने डॉक्टरांना या गोळ्यांबाबत विचारले असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

डॉक्टरांशी बोलताना महिलेला तिच्या पतीला लैंगिक समस्या असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिला वाटू लागले की आपला पती नपुंसक आहे आणि तिला शारीरिक सुख कधीच मिळणार नाही. हे सर्व समजल्यानंतर त्या महिलेला चांगलाच धक्का बसला आणि तिला काळजी वाटू लागली. त्यामुळे महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली होती.

हे ही वाचा : Chhagan Bhujbal : अशोक सराफांसोबत भुजबळांनी ‘या’ चित्रपटात केलंय काम

या तक्रारीनुसार, ‘पती शारीरिक सुख देत नाही’. तसेच तो नपुंसक असल्याचा आरोप महिलेने केला आहे. लग्नापुर्वी पतीने ही गोष्ट लपवून ठेवली आणि त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे म्हणत महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या या तक्रारीनंतर कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्यात विश्वासघात आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहे.

    follow whatsapp