Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चे एकाच महिलेने 28 अर्ज भरले, खात्यात किती पैसे आले?

इम्तियाज मुजावर

04 Sep 2024 (अपडेटेड: 04 Sep 2024, 08:49 PM)

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : खारघर येथील महिलेचा आधार कार्ड अनधिकृत रित्या वापरल्याची तक्रार पण पनवेल येथील तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार सातारा जिल्ह्यातील एका महिलेकडून झाल्याचे उघडकीस आले आहे.

ladki bahin yojana satara case for filling 28 application in mukhyamantri ladki bahin yojana scheme husband wife arrested shocking crime story

साताऱ्यातील एका महिलेने तब्बल 28 अर्ज भरल्याचा प्रकार घडला आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकाच महिलेने 28 अर्ज भरले

point

लाडकी बहीण योजनेचे किती पैसे लाटले?

point

नवरा बायकोला पोलिसांकडून अटक

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme : राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची खुप चर्चा आहे. या योजनेत आता एक घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे. साताऱ्यातील एका महिलेने तब्बल 28 अर्ज भरल्याचा प्रकार घडला आहे. या अर्जाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याचा प्रयत्न केला आहे. पनवेलमध्ये एका महिलेने तिच्या आधारकार्डचा  गैरवापर झाल्याची तक्रार केल्यानंतर ही घटना चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणी वडूज पोलिसांनी प्रतीक्षा पोपट जाधव आणि तिचा पती गणेश संजय घाडगे या दाम्पत्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. (ladki bahin yojana satara case for filling 28 application in mukhyamantri ladki bahin yojana scheme husband wife arrested shocking crime story) 

हे वाचलं का?

खारघर येथील महिलेचा आधार कार्ड अनधिकृत रित्या वापरल्याची तक्रार पण पनवेल येथील तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार सातारा जिल्ह्यातील एका महिलेकडून झाल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर तात्काळ सातारा जिल्हा प्रशासनाने लाडकी बहीण योजने अंतर्गत माहिती घेतली असता खटाव तालुक्यातील मायणीच्या एका दांपत्याने 28 अर्जाची अनधिकृत पद्धतीने अर्ज भरल्याचे निष्पन्न झाले होते. 

हे ही वाचा : Anil Deshmukh : अनिल देशमुख पुन्हा तुरुंगात जाणार? CBI कडून गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

या घटनेचा तपास करण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने त्री सदस्य समिती गठित करून संबंधित दांपत्याने भरलेल्या अर्जाची पडताळणी केली असता या महिलेने एकाच नावाने गुगल वरून घेतलेल्या वेगवेगळ्या आधार कार्ड नंबरचा वापर करून माणदेशी महिला बँक वडुज शाखेचे खाते अर्जांना संलग्न केले होते. या पडताळणीत 28 अर्जापैकी एकाच अर्जाची 3000 रुपये रक्कम संबंधित महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे. इतर उरलेल्या कोणत्याही अर्जाचे पैसे बँक खात्यात जमा झालेले नसल्याची माहिती आहे. या प्रकरणाची जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र या घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 या प्रकरणात वडूज पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. संबंधित संशयित महिला (माहेरचे नाव) प्रतीक्षा पोपट जाधव आणि तिचा पती गणेश संजय घाडगे अशी या दाम्पत्याची नावे आहेत. तसेच या दाम्पत्याला वडूज न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी दोघांना 6 सप्टेंबर पर्यंत त्यांना न्यायालयाने पोलीस कोठली सुनावली आहे. 

हे ही वाचा : Ambernath : भाजप आमदार गोळीबार प्रकरणाचा वाद उफाळला, बिल्डर हत्यारबंद गावगुंडांसह आला अन्...तुफान राडा!

वेगवेगळे आधार कार्ड वापरून  30 खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पती-पत्नीला सातारा पोलिसांनी अटक केली असून जिल्हा परिषदेने स्थापन केलेल्या त्रि सदस्य समितीने चौकशी अहवाल सादर केला आहे. पैशाच्या हव्यासापोटी हा प्रकार केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp