हवी होती मुलगी.. पण तिसरा मुलगा होताच बापाने घेतला चिमुकल्याचा जीव

मुंबई तक

• 01:24 PM • 15 Jan 2024

मध्य प्रदेशातील बैतूरमध्ये एका बापाने तिसराही आपल्याला मुलगाच झाला म्हणून त्याने बारा दिवसांच्या नवजात बालकाची गळा आवळून हत्या केली आहे. मला मुलगीच पाहिजे होती, म्हणून बाळाचा गळा आवळल्याचे सांगत त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. यावेळी त्याने आपल्या पत्नीलाहा बेदम मारहाण केली आहे.

Madhya Pradesh 12-day-old newborn baby was killed by his father in Bailur police arrested

Madhya Pradesh 12-day-old newborn baby was killed by his father in Bailur police arrested

follow google news

MP Murder Case: मध्य प्रदेशमधील बैतूलमध्ये (Madhya Pradesh Betul) एका बापाने आपल्या 12 दिवसाच्या नवजात मुलाची (newborn child) गळा दाबून हत्या (Murder) केली आहे. नवजात बालकाची हत्या केल्याचे समजताच पोलिसांनी बापाल ताब्यात घेतले आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले की, नवजात बालकाच्या जन्माआधीच त्याला दोन मुले होती. मात्र तरीही तिसरा मुलगाच जन्मला आल्यामुळे त्याने दारुच्या नशेत नवजात बाळाची गळा दाबून हत्या केली. हे वृत्त जेव्हा सगळ्यांना समजले तेव्हा या घटनेवर अनेकांचा विश्वास बसला नाही.

हे वाचलं का?

नवजात बाळाची हत्या

बैतूलमधील बज्जरवाडामध्ये ही भयंकर घटना घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे. रविवारी म्हणजेच 14 रोजी सायंकाळी अनिल उइके नावाच्या व्यक्तीने 12 दिवसापूर्वी जन्मलेल्या नवजात मुलाची गळा दाबून हत्या केली. ही घटना पोलिसांना समजताच नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. तर संबंधित बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा >> ठाकरेंच्या ‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट?, निनावी फोनने मुंबई पोलीस दलात खळबळ

दारु पिऊन धिंगाणा

नवजात बालकाची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. यावेळी अनिल उइकेची पत्नी रुचिकाने सांगितले की, अनिल उइके दारू पिऊन ज्यावेळी घरी आला. त्यावेळी त्याने घरांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी मृत बाळाच्या आईला म्हणजेच रुचिकाला त्याने प्रचंड मारहाण केली.

नवऱ्याला घाबरून बाहेर पळाली

नवऱ्याला घाबरून ती घराबाहेर पळून गेली. त्यावेळी बाळ घरी एकटेच होते. मात्र ती नंतर घरी आल्यावर समोरील दृश्य पाहून तिला धक्काच बसला. कारण ती घरात आली तेव्हा नवजात बाळाचा मृतदेह जमिनीवर पडला होता. तर त्याच्या गळ्यावर गळा दाबल्याच्या खूणाही दिसत होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुलगीसाठी होता हट्ट

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीनंतर त्याने आपणच नवजात बाळाची हत्या केल्याचे सांगितले. यावेळी त्याने सांगितले की, त्याला आधीच दोन मुले होती. मात्र त्याला तिसरी मुलगी पाहिजे होती, मात्र तिसराही मुलगाच झाल्याने त्याने त्याची गळा आवळून हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने आपल्या पत्नीला ऑपरेशन करून घेण्यास सांगितले होते, मात्र ती गर्भवती राहिली. यावेळी त्याला मुलगी व्हावी अशी त्याची इच्छा होती. मात्र मुलगा झाल्यामुळे त्याने त्याची हत्या केली.

    follow whatsapp