Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूर (Indore) येथील अनाथ आश्रमातील मुलींनी तेथील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. येथे 4 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींनी त्यांच्यासोबत घडलेली क्रूरता जेव्हा पोलिसांसमोर सांगितली तेव्हा अधिकारीही चकित झाले. या प्रकरणी तक्रारीच्या आधारे इंदूर पोलिसांनी अनाथ आश्रमातील चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. (Madhya Pradesh INdore Crime Story In orphanage 21 girls Were Torture stripped hung upside down and burnt)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या अनाथ आश्रमातील 21 मुलींनी कर्मचाऱ्यांवर छळ (Girl Abuse) केल्याचा आरोप केला आहे. त्यांचे कपडे काढून लोखंडी चिमट्याने चटके दिले. उलटं टांगून लाल मिरचीची धुरी दिली. असे मुलींनी तेथील कर्माचाऱ्यांविरूद्ध आरोप केले आहेत.
वाचा : आंतरवाली ते मुंबई… मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगेंच्या कुटुंबीयांचा सहभाग!
13 जानेवारी रोजी बाल कल्याण समिती (CWC) च्या टीमने इंदूरमधील वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या अनाथ आश्रमाची अचानक तपासणी केली होती. यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला.
अनाथ आश्रमातील मुलींनी जेव्हा अधिकाऱ्यांना आपला त्रास सांगितला तेव्हा ते अवाक् झाले. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध बाल न्याय कायदा आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वाचा : Ayodhya Ram Mandir: शिंदे सरकारचा मोठा निर्णय, 22 जानेवारीला महाराष्ट्रात…
‘गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई करण्यात येईल’- अतिरिक्त पोलीस उपायुक्त
इंदूरचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमरेंद्र सिंह यांनी सांगितले की, ‘मुलींनी त्यांच्या वक्तव्यात छेडछाडीबाबत बोलले आहे. या आधारे पोलिसांनी वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आयुषी, सुजाता, सुमन, आरती आणि बबली अशा या महिला आरोपींची नावे आहेत.
वाचा : Uddhav Thackeray: ‘तिथे जे नालायक लोकं बसलेत ते हिंदुत्वात..’, ठाकरेंचा पुन्हा संताप
इंदूरचे जिल्हाधिकारी या घटनेवर काय म्हणाले?
इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सांगितले की, ‘अनाथ आश्रमात राहणाऱ्या मुली वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. तपासणीत या मुलींवर अत्याचार झाल्याचे आढळून आले. आम्ही या प्रकरणाचा व्यापक तपास सुरू केला आहे. बाल कल्याण समितीच्या (CWC) अहवालानंतर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT