manipur viral video : मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचे घर जमावाने जाळले आहे. ही घटना चेकमाई परिसरातील आहे. अचानक जमावाने आरोपीचे घर पेटवून दिले. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो फॉरवर्ड करणाऱ्यांपैकी बहुतांश महिला असल्याचं पाहायला मिळत आहे. खुयरुम हेरदास असे मुख्य आरोपीचे नाव आहे. (In Manipur, the house of one of the main accused of raping women has been burnt by the mob.)
ADVERTISEMENT
मणिपूर हिंसाचारामुळे अशांत असून, त्यातच महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या व्हिडिओने संतापाची लाट उसळली. याप्रकरणी मुख्य आरोपी खुयरुम हेरदासला पोलिसांनी गुरुवारी थौबल जिल्ह्यातून अटक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.
अन्य आरोपींचा शोध सुरू
हेरोदास 32 वर्षाचा आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली असून त्यात तो हिरव्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरादास हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या व्हायरल व्हिडिओच्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची 12 पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक सतत छापेमारी करत आहेत.
4 मे चा व्हायरल व्हिडिओ
आयटीएलएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा व्हिडिओ कांगपोकपी जिल्ह्यातील 4 मे रोजीचा आहे. यामध्ये महिलांना नग्न अवस्थेत दाखवण्यात आले आहे. पुरुषांचा जमाव सतत पीडित महिलांचा विनयभंग करताना दिसत आहे. त्याचबरोबर पीडित महिला मदतीसाठी सतत याचना करत आहेत. गुन्हेगारांनी हा व्हिडिओ बनवल्यानंतर व्हायरलही केल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा >> Manipur: जमावाकडून महिलांची नग्न धिंड, गँगरेप आणि खून… मणिपूरमध्ये काय घडलं?
तक्रारीनुसार, मणिपूरमध्ये पहिल्यांदा हिंसाचार भडकल्याच्या एका दिवसानंतर, 4 मे रोजी दुपारी, एके रायफल, एसएलआर, इन्सास आणि 303 रायफल्स यांसारख्या शस्त्रांनी सज्ज सुमारे 1,000 लोक बी.के. फिनॉम गावात शिरले होते. यादरम्यान त्यांनी गावात तोडफोड केली. मालमत्ता लुटली आणि घरे जाळली. तक्रारीनुसार, लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. यादरम्यान पाच जणांनी स्वत:ला वाचवण्यासाठी जंगलाकडे धाव घेतली. यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. त्यात एक 56 वर्षीय पुरुष, त्याचा 19 वर्षांचा मुलगा आणि 21 वर्षांची मुलगी याशिवाय 42 वर्षीय आणि 52 वर्षीय महिलांचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आज तकला सांगितले की, सरकारने त्या व्हिडिओची स्वतःहून दखल घेतली आहे. ज्यामध्ये 2 महिलांना जमावाकडून नग्नावस्थेत धिंड काढताना दाखवण्यात आले असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बी. फेनोम गावातील 65 वर्षीय मुख्याध्यापक थांगबोई वायफेई यांनी सायकुल पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत एका तिसऱ्या महिलेवर जमावाने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
दोन पुरुषांची हत्या
नॉन्गपोक सेकमाई पोलीस स्टेशनच्या पथकाने जंगलात पळून गेलेल्या या लोकांची सुटका केली. तथापि, नॉन्गपोक सेकमाई पोलीस ठाण्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तुबूजवळ जमावाने त्यांना पोलीस पथकाच्या ताब्यातून हिसकावून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जमावाने 56 वर्षीय व्यक्तीची हत्या केली. यानंतर तिन्ही महिलांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर 21 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
वाचा >> IrshalWadi Landslide : ‘माझे तर सगळेच मेले’, वन विभागामुळे इर्शाळवाडी गेली मृत्यूच्या जबड्यात!
यादरम्यान मुलीच्या लहान भावाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यालाही मारले. एक महिला ओळखीच्यांच्या मदतीने घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाली. त्याचवेळी गँगरेपनंतर दोन्ही महिलांना रस्त्यावर फिरायला लावले.
ADVERTISEMENT