Crime News Marathi : आठ वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची मुलगी आणि नवरा-बायको. आनंदी लहान कुटुंब. पण एका छोट्याशा चुकीचा फटका या कुटुंबाला इतका बसला की त्यांना सामूहिक आत्महत्या करावी लागली. मुलांना विष दिलं आणि पती-पत्नीने गळफास लावून घेतला. हे घडलं एका लोन अॅप्समुळे. एक कुटुंब कसं उद्ध्वस्त झालं, याची सगळी कहाणी सुसाईड नोटमुळे समोर आलीये. (A case of mass suicide has come to light in Bhopal, the capital of Madhya Pradesh. Here 4 people of the same family have committed suicide.)
ADVERTISEMENT
ही घटना घडली आहे मध्य प्रदेशमधील भोपाळजवळ असलेल्या रतीबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीलबाद भागात. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट आणि सल्फासच्या गोळ्यांचे पाकिटही जप्त केले आहे. एसीपी चंद्र प्रकाश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी 8 आणि 3 वर्षाच्या मुलांना सल्फासच्या गोळ्या दिल्या आणि नंतर पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आर्थिक अडचणी सापडल्याने कुटुंबाला जगवण्यासाठी लोन अॅप्स कर्ज घेतलं, पण शेवटपर्यंत बाहेर पडताच आले नाही आणि कुटुंब संपलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हा एका खाजगी विमा कंपनीत कामाला होता, मात्र काही तोट्यामुळे त्याने कर्ज घेतले होते. हे कर्ज त्याला वेळेवर फेडता आले नाही, त्यामुळे त्याच्यावर कर्ज वाढतच गेले आणि त्याने हे जीवघेणे पाऊल उचलले. ही घटना नेमकी का आणि कशी घडली, हे सुसाईड नोटमुळे समोर आले आहे.
चार पानांची सुसाईड नोट, कुटुंबाची प्रचंड वेदनादायी कहाणी
सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, ‘काय करावं समजत नाहीये. आमच्या इतक्या गोड कुटुंबाला कुणाची नजर लागली माहीत नाही. हात जोडून कुटुंबीयांची माफी मागायची आहे. एका चुकीमुळे आमच्या जवळच्या सर्व लोकांना खूप त्रास झाला.’
वाचा >> 25 वर्षीय तरुणीचे अर्ध जळालेलं मांस खाल्लं, दोघांनी का केलं किळसवाणं कृत्य?
‘मी कुटुंबासह आनंदाने राहत होतो. कोणतीही समस्या किंवा कशाची चिंता नव्हती. पण एप्रिलमध्ये माझ्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. ऑनलाइन काम करण्याची ऑफर आली. तोच मेसेज पुन्हा टेलिग्रामवर आला. थोडे पैसे मिळतील आणि माझ्या गरजांही पूर्ण होतील म्हणून मी यासाठी तयार झालो. जास्त वेळही द्यायचा नव्हता म्हणून काम सुरू केले.’
‘सुरुवातीला थोडा फायदा झाला, पण हळूहळू मी या दलदलीत अडकत गेलो. थोडा वेळ मिळाला की मी ते काम करायला लागायचो. पुढे गेल्यावर त्याचा भार इतका वाढला की माझ्या इतर कामासह या कामात खर्च झालेल्या पैशाचा हिशेब ठेवता आला नाही. हे पैसे घरी अजिबात वापरता आले नाहीत. कामाचा ताण खूप वाढला.’
वाचा >> Seema Haidar : पाकिस्तानी सीमा हैदरने नवऱ्याला सोडले अन् भारताच्या सचिनसोबत…, कहाणी काय?
‘मला मेसेज येऊ लागले की, ऑर्डर पूर्ण कर आणि कमिशन (पैसे) काढून घे. पण ती एक दलदल होती, जिथून बाहेर पडणे कठीण होते. जेव्हा सर्व पैसे संपले तेव्हा कंपनीने कर्ज देऊ केले. चार वर्षांपूर्वी मी ज्या कंपनीत होतो ती बंद झाली होती, त्यानंतर माझा सीबील स्कोर खराब झाला. म्हणून मी नकार दिला, कारण माझी क्रेडिट स्कोर आधीच खराब झाला होता. कर्ज कुठून मिळणार, पण कंपनीच्या सांगण्यावरून मी प्रयत्न केले आणि कर्ज मिळवत राहिलो. ते पैसे मी पाण्यासारखे कंपनीत गुंतवत राहिलो.’
लोन अॅपच्या दलदलीतून बाहेर पडायचे होते, पण…
सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘काम सुरू करण्यापूर्वी मी ई-कॉमर्स कंपनीची वेबसाइट तपासली होती. कोविड नंतर 2022 मध्ये कोलंबियापासून सुरू झालेली ही कपंनी TRP साठी काम करते. हे सर्व पाहून मी कामाला सुरुवात केली, पण माहिती नव्हतं की, या वळणावर मी उभा राहीन की कोणताही मार्ग उरणार नाही.’
‘माझ्या पत्नीला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला या कामाची माहिती नव्हती. बायको जेव्हा मला पाहायची, तेव्हा ती म्हणायची की, काही चुकीचं करू नका. आणि मी नकार देत म्हणायचो की मी सर्व काही फक्त तुमच्या आनंदासाठी करत आहे. पण मी काय केले ते समजत नाही.’
वाचा >> बारामतीत खळबळ! दगडाने डोक्याचा केला चेंदामेंदा, ऊसात सापडला मृतदेह
‘ऑनलाइन जॉबचा बळी ठरल्यावर वाटले की, काही दिवसांनी पैसे मिळाल्यावर सगळ्यांचे कर्ज फेडून टाकेन, पण एवढे काही होईल हे असं कधी वाटलं नाही. ऑनलाइन जॉब देणाऱ्यांनी माझ्यावर एवढं कर्ज काढलं की मला स्वतःलाही आश्चर्य वाटलं. माझी फसवणूक झाल्याचे मला समजले. माझ्यावर वेळोवेळी पैशाचा दबाव आणला जात होता. हे पैसे मी स्वतःसाठी घेतले नाहीत, मला ते वापरताही आले नाहीत. कंपनीने कर्ज देऊ केले आणि मी पैसे घेऊन कंपनीसाठीच वापरले.’
‘जूनमध्ये कर्जाचा बोजा इतका वाढला की वसुली करणाऱ्यांच्या धमक्या येऊ लागल्या. मी कशीतरी व्यवस्था केली आणि ईएमआय भरला, पण जुलैमध्ये कर्जदारांनी माझा फोन हॅक केला. त्यातून माहिती काढून त्यांनी नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तुमचे अश्लील आणि चुकीचे फोटो बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करू, तुमची बदनामी करू, अशी धमकी त्यांनी (कर्ज कंपनी) द्यायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या बॉसच्या डीपीचा (फोटो) गैरवापरही केला. यामुळे मला खूप अपराधी वाटत आहे. माझ्या ओळखीचे प्रत्येकजण माझ्या एका चुकीची शिक्षा भोगत आहे. त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे.’
‘कुणाला तोंड दाखवू शकत नाही’
चार पानी सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिलं आहे की, ‘मी सायबर क्राईमच्या कार्यालयात गेलो, पण तिथे अधिकारी नसल्यामुळे आणि सुट्टीमुळे प्रकरण पुढे ढकलण्यात आलं. पुन्हा अर्ज करून घेण्यासाठी वकिलाला भेटलो. त्यांनी मसुदा तयार करण्यासाठी वेळ मागितला. पण मला ना कुणाशी बोलता येतंय ना कुणाशी नजर मिळवू शकतो. आज मी माझ्याच नजरेतून उतरलो आहे.’
‘नोकरी सोडण्याची वेळ आली आहे. माझे आणि माझ्या कुटुंबाचे भविष्य दिसत नाही. मी कुणाला तोंड दाखवू शकत नाही. मी कुटुंबाच्या नजरेला नजर कशी मिळवू? मला माझे वडील, आई, वडील, आई, भावजय, प्रिय बहिणी, प्रिय मुलगी, सर्वांना विचारायचे आहे की, तुमच्याशी नजर कशी मिळवू? या सगळ्यात मला भीती वाटते की भविष्यात माझ्या मुलीच्या लग्नात अडचण येऊ नये.’
वाचा >> आईला शेजाऱ्यासोबत पाहिलं नग्नावस्थेत, अन् मुलासोबत घडली थरकाप उडवणारी घटना
‘म्हणूनच मी कुटुंबाला म्हणजे पत्नी आणि मुलं रिशू आणि किशू यांना अडचणीत सोडू शकत नाही. मी सर्वांना सोबत घेऊन जात आहे. मी पुन्हा एकदा माफी मागतो. कृपया माझ्या कुटुंबाला क्षमा करा. मी मजबूर आहे आम्ही निघून गेल्यावर कदाचित सर्व काही ठीक होईल.’
सुसाईड नोटमध्ये सांगितली शेवटची इच्छा
‘माझी विनंती आहे की, आम्ही गेल्यानंतर घरच्यांना कर्जासाठी त्रास होऊ नये, ही विनंती. तसेच कोणत्याही नातेवाईक किंवा सहकारी कर्मचाऱ्याला त्रास देऊ नये. मी माझे वडील-आई, वडील-आई, तीन बहिणी, मोठे भाऊ, अंतू दी, दोन्ही मेहुण्यांची माफी मागतो. आम्हाला माफ करा. आपला सहवास इथपर्यंतच होता. आमचं शवविच्छेदन करू नका आणि सर्वांवर एकत्रितपणे अंत्यसंस्कार करावेत, ही आमची शेवटची इच्छा आहे. जेणेकरून आम्ही चौघेही एकत्र राहू’, असं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
ADVERTISEMENT