Thane: MSRDC च्या संचालकाच्या मुलाचं भयंकर कृत्य, गर्लफ्रेंडला कारने चिरडल्याचा आरोप

मुंबई तक

15 Dec 2023 (अपडेटेड: 15 Dec 2023, 04:30 PM)

Ashvajit Gaikwad crushing girlfriend Priya Singh with car: MSRDC च्या संचालकाचा मुलगा अश्वजीत गायकवाड याने त्याची गर्लफ्रेंड प्रिया सिंह हिला कारने चिरडल्याचा अत्यंत गंभीर असा आरोप त्याच्याविरोधात करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी FIR देखील दाखल करण्यात आला आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Ashvajit Gaikwad Girlfriend: ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओव्हल कॉम्प्लेक्समध्ये अश्वजीत गायकवाड नावाच्या तरुणाने त्याची गर्लफ्रेंड प्रिया सिंह हिला कारने चिरडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत प्रिया सिंह ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. अश्वजीत गायकवाड याने दोन मित्रांच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचा आरोप पीडीत प्रियाने केला आहे. सध्या प्रियावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे अश्वजीत गायकवाड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)चे संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र आहेत.

हे वाचलं का?

‘प्रथम प्राणघातक हल्ला आणि नंतर रेंज रोव्हर डिफेंडरने चिरडले’

पीडित प्रिया सिंग ही घोडबंदर येथे राहते. प्रिया ही उच्च शिक्षित आहे आणि तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य आहे. सोमवारी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा संकुलात अश्वजीत गायकवाड याने प्रियाला प्रथम मारहाण केल्याचा आणि यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास तिला रेंज रोव्हर डिफेंडर कारने चिरडून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हे ही वाचा>> जावयाचा जीव सासूवर जडला, अंधारात चाळे सुरू असतानाच बायको आली अन्…

प्रिया सिंहने आरोप केला आहे की, अश्वजीत गायकवाड याने त्याच्या मित्रांकडून याबाबत सल्ला घेतला होता. अश्वजीत गायकवाड यांचे मित्र रोमिल पाटील आणि सागर शेळके यांनी सल्ला दिल्याचा आरोपही प्रियाने केला आहे. आरोपानुसार, अश्वजीत गायकवाडने प्रथम प्रिया सिंहला मारहाण केली. त्यानंतर तिच्या हाताला चावा घेतला. यानंतर त्याने तिला कारमधून दूर नेलं आणि तिला चिरडण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर प्रिया सिंहला तशाच अवस्थेत सोडून तो पळून गेला. पीडित प्रिया सिंह हिने हे सर्व आरोप तिच्या इन्स्टाग्राम आयडीवर पोस्ट करत न्यायाची याचना केली आहे.

तीन दिवस उलटूनही आरोपी मोकाट

सोमवारी सकाळी अश्वजीत गायकवाड याने प्रेयसी प्रिया सिंहला त्याच्याच कारने उडवले आणि तिला त्याच अवस्थेत तिथे सोडून पळून गेला होता. मात्र या घटनेला 3 दिवस उलटून गेले तरी कासारवडवली पोलीस ठाण्यात फक्त एफआयआर दाखल करण्यात आली आहे, मात्र कासारवडवली पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही.

हे ही वाचा>> आठ मुलींच्या बापानं केला दुसऱ्या लग्नाचा विचार, पत्नीला समजताच थेट सुपारीच…

आरोपींचे उच्च राजकीय संबंध

अश्वजीत गायकवाड हा एमएसआरडीसीचे संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र आहेत आणि एमएसआरडीसी हे खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या मंत्री दादा भुसे यांच्याकडे आहे.तसेच अनिल गायकवाड यांचे मोठे राजकीय संबंध असल्याने पोलीस अद्याप कोणतीही कारवाई करत नसल्याचे आरोप प्रिया सिंहकडून केला जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशीही केली नसल्याचा आरोप तिने केला आहे.

एफआयआर मागे घेण्यासाठी प्रिया सिंहवर दबाव

प्रिया सिंह हिने असंही सांगितले की, अश्वजीत गायकवाड आणि तिच्या मित्र हे एफआयआर मागे घेण्यासाठी प्रियावर सतत दबाव टाकत आहेत, अश्वजीत गायकवाडचे दोन्ही मित्र रोमिल पाटील आणि सुनील शेळके हे हॉस्पिटलमध्ये सातत्याने येत असून ते एफआयआर मागे घेण्याची धमकीही देत असल्याचं प्रियाने म्हटलं आहे.

    follow whatsapp