Mumbai Crime News : मुंबईतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रियकराने प्रेयसीच्या डोळ्यासमोर तिच्या 15 महिन्याच्या बाळाची हत्या केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही हत्या होत असताना आईचं काळीज देखील तुटलं नव्हतं. या हत्येनंतर बाळाचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला होता. या घटनेने सध्या मुंबई हादरली आहे.
(mumbai crime news boy friend kill 15 months child in front of mother mumbai crime)
ADVERTISEMENT
जोगेश्वरीमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी प्रियकर आणि प्रेयसी दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहायचे. या दोघांनी हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन बाळ बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर पोलिसांना कसून तपास केला असता घटनेचा उलगडा झाला.
हे ही वाचा :Lok Sabha : 'गुवाहाटीला जाण्यापूर्वी ठाकरेंना फोन केला, पण...',
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुंबईत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या या जोडप्याचे नाव राजेश राणा (वय 28) आणि रिंकी दास (वय 23) आहे. हे जोडपं ओरीसाला राहायचं. 4 महिन्यापूर्वीच आपल्या 15 महिन्याच्या बाळाला घेऊन ती मुंबईला आली होती. हे बाळ प्रेयसी रिंकी दासचं होतं. हे दोघ जण जोगेश्वरी परिसरात राहायचे.
हत्येच्या दुसऱ्या दिवशी अचानक या जोडप्याने पोलीस ठाण्यात येऊन बाळ बेपत्ता झाल्याची तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला असता ही हत्या प्रियकराने करून मृतदेह नाल्यात फेकल्याचे समोर आले होते.
पोलीस चौकशीत एक धक्कादायक माहिती देखील हाती लागली होती. राजेश आणि रिंकी या दोघांचा पहिलं लग्न झालं होतं. यामध्ये रिंकीला पहिल्या लग्नापासून एक मुलगा होता. मात्र पहिल्या नवऱ्याला सोडल्यानंतर तिने बाळाला देखील त्याच्याकडेच सोडून दिले होते.
हे ही वाचा :तुमच्या मतदारासंघात नेमकं किती मतदान? आकडेवारी जाहीर!
पहिल लग्न मोडल्यानंतर रिंकीचं तिच्या काकासोबत सुत जुळलं आणि ती गर्भवती राहिली होती. ही घटना गावातल्यांना कळताच, पंचायत बोलावण्यात आली. आणि पंचायतीसमोर काकाने रिंकीशी लग्न करण्याचं कबुल केलं. पण एकदिवस कामासाठी बाहेर जातो सांगून काका पळून गेला होता.
त्यानंतर दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर रिंकी राजेश राणाच्या प्रेमात पडली. आणि त्यानंतर दोघे पळुन मुंबईत आले होते. मुंबईत एकत्र राहताना दुसऱ्याचा मुलगा आपल्यासोबत राहतो, हे राणाला आवडत नव्हतं. त्यामुळे तो सतत बाळाला मारहाण करायचा.
दरम्यान घटनेच्या दिवशीच अशीच राजेशने बाळाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत बाळाचा जीव गेला. विषेश म्हणजे त्यावेळी बाळाची आई देखील तिथेच उभी होती. ही हत्या लपवण्यासाठी दोघांनी बाळाला नाल्यात फेकले होते. पोलिसांना जोडप्याचा हा इतिहास कळताच त्यांना संशय त्याच्यावरच बळावला. त्यामुळे पोलिसांनी दोघांना पोलीसी खाक्या दाखवताच घटनेचा उलगडा झाला.
ADVERTISEMENT