Crime : मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर वर्षभर बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर…

प्रशांत गोमाणे

• 11:17 AM • 18 Dec 2023

सुरुवातीच्या ओळखीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. या दरम्यान ऑगस्ट 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत त्याने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले होते. यामुळे मुलगी गर्भवती राहिली. या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

mumbai crime news girl raping case jammu kashmir boy arrested crime story mumbai

mumbai crime news girl raping case jammu kashmir boy arrested crime story mumbai

follow google news

Mumbai Crime News : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलीवर (Minor girl Rape) बलात्काराची घटना घडली आहे. एक दोन वेळ नव्हे तर तब्बल वर्षभर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. या बलात्कारामुळे पीडीत मुलगी ही गर्भवती राहिली आहे. त्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसचे पीडीत मुलीच्या कुटुंबियांनी आरोपी विरोधात पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रीरीनंतर आरोपी तरूण हा पीडितेला भेटायला रूग्णालयात पोहोचला होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.(mumbai crime news girl raping case jammu kashmir boy arrested crime story mumbai)

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) कुपवाडा येथे राहणारा 19 वर्षीय आरोपी शहरात कामानिमित्त राहत होता. या दरम्यान 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तो संपर्कात आला होता. सुरुवातीच्या ओळखीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली. या दरम्यान ऑगस्ट 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत त्याने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले होते. यामुळे मुलगी गर्भवती राहिली. या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

हे ही वाचा :Salim Kutta: ‘त्यांचं’ नाव घेतलं तर तुम्हाला एवढ्या का मिरच्या लागल्या?, खडसेंचे प्रचंड गंभीर आरोप

पीडित मुलीला वांद्रे येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याबाबतची माहिती आरोपीला मिळताच त्याने जाऊन पीडीतेची भेट घेण्याचा निर्णय़ घेतला. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रूग्णालयातच अटक केली. या प्रकरणी आता आयपीसी (भारतीय दंड संहिता) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 376 अंतर्गत एफआयआर नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान केरळमधील कोचीमध्ये 52 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अलप्पुझा भागातील आहे.या प्रकरणी पोलिसांनी आसाममध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 दिवसांपूर्वी एका महिलेने तिथे काम करणाऱ्या मजुराला जवळच्या मेट्रो स्टेशनबद्दल विचारले. मजूर फिरदौसने सांगितले की, मी मेट्रो स्टेशनचा रस्ता सांगेन.त्यानंतर तो तिच्यासोबत काही अंतरावर गेला असता पुलाजवळ संधी मिळताच त्याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर तिला मारहाण केली. या घटनेमुळे महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस करित आहेत.

    follow whatsapp