Sharad Mohol Murder: कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ ज्याच्या नावानं अनेकांचा थरकाप उडत होता. मात्र कोथरूड परिसरातील सुतारदरा भागातून जात असतानाच काहीजणांनी त्याची हत्या केली आहे. त्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्याची हत्या किती प्लॅन (Murder Plan) करून करण्यात आली होती हे लक्षात येते. अवघ्या काही सेकंदात शरद मोहोळचा गेम झाला, आणि तो निपचिंत झाला. स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळ हा पत्नी स्वाती मोहोळच्या (Swati Mohol) माध्यमातून राजकारणात आला होता. मात्र 5 जानेवारी रोजी शरद मोहोळचा भर रस्त्यात त्याच्याच साथीदारांनी त्याचा गेम केला. मात्र आता शरद मोहोळच्या हत्येनंतर अनेक प्रश्न समोर येऊ लागले आहेत.
ADVERTISEMENT
आर्थिक देवाण-घेवाण
मारणे गँग विरुद्ध मोहोळ गँगच्या जुन्या रायवलरीतून ही हत्या झाली असावी असं अनेकांना वाटू शकेल मात्र शरद मोहोळला त्याच्या जवळच्याच लोकांनी संपवलं असल्याचं उघड झालं आहे. त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरचादेखील समावेश आहे. आर्थिक वाद आणि जमिनीच्या वादातून मोहोळची हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.
लग्नाच्या वाढदिवसादिवशीच हत्या
ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालत होते. हिरव्या रंगाचा कुर्ता घालून शरद मोहोळ पुढे चालत होता तर मारेकरी असलेले त्याचे बॉडीगार्ड मागे चालत होते. सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही दूर गेला असेल तोच त्याच्या याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या, एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात घुसली, आणि तो खाली कोसलळा.
हे ही वाचा >> कुख्यात गुंड शरद मोहोळच्या थरारक हत्याकांडाचे CCTV फुटेज आलं समोर, नेमकं काय घडलं?
साताऱ्याच्या दिशेने पळ
शरद मोहोळला गोळ्या झाडणारे तीन मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारासह सुतारदरा भागातून पळून गेले. मात्र त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक एक्सव्हीयू गाडी घेऊन हजर होते. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून या 8 जणांनी साताऱ्याच्या दिशेने वाहनातून पळून जायचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन त्यांचा पाठलाग करून शिरवळ हल्लेखोरांना ताब्यात घेतले.
वाढदिवस करणारेच मारेकरी
शरद मोहोळचे हे मारेकरी त्याचे साथीदार म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याच्याच टोळीत काम करत होते. मात्र त्यामधील साहिल पोळेकर हा तर हत्येच्या आधी काहीवेळ शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत होता. वरवर शरद मोहोळचे हे साथीदार असल्याचे दाखवणारेच त्याचे मारेकरी निघाले. कारण ते गेल्या कित्येक दिवसांपासून नाराज होते.
साथीदार म्हणूनच सोबत
विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणे होती तर साहिल पोळेकरसोबतदेखील जमीन आणि पैशांच्या देवाण-घेवाणीतून वाद झाले होते. मात्र तरीही ते शरद मोहोळचे साथीदार म्हणूनच सोबत वावरत होते. मात्र हेच आपला जीव घेतील याची कल्पनाही शरद मोहोळला कधी आली नव्हती.
गृहविभागासमोरही मोठं आव्हान
स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळ पत्नी स्वाती मोहोळच्या माध्यमातून राजकारणात आला होता. राजकारणात एन्ट्री करताना स्वतःला सेफ करण्याचा कदाचित त्याचा प्रयत्नही झाला असावा मात्र जे सुरक्षेसाठी ठेवले होते, त्यांनीच त्याचा घात केला आणि त्याला संपवले. मात्र आता आता पुन्हा तोच सवाल आहे सुरु झाला आहे शरद मोहोळच्या मृत्यूनं पुण्यातील हे टोळीयुद्ध संपलंय की सुरु झालं आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या आणि गृहविभागासमोरही मोठं आव्हान उभा राहिलं आहे.
ADVERTISEMENT