पत्नी-मुलगी अन् किंग कोब्रा… संशयाच्या भूतामुळे घरात सोडला नाग, नंतर…

रोहिणी ठोंबरे

24 Nov 2023 (अपडेटेड: 24 Nov 2023, 05:07 AM)

ओडिशातील गंजम जिल्ह्यात पोलिसांना माहिती मिळाली होती की, एका घरात आई आणि तिच्या 2 वर्षीय निरागस मुलीला साप चावला आणि दोघींचा मृत्यू झाला.

Odisha Crime Murder News A Man Arrested for killing Wife and daughter by Releasing Cobra Snake into there Room

Odisha Crime Murder News A Man Arrested for killing Wife and daughter by Releasing Cobra Snake into there Room

follow google news

Odisha Crime News : सध्या देशात गुन्हेगारीची (Crime Cases) नवनवीन प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. जवळचेच काटा काढायला मागे पुढे पाहत नाहीत अशीही बरीच प्रकरणं आहेत. अशीच एक नुकतीच घटना घडली आहे जी ऐकल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल. ही घटना ओडिशामध्ये (Odisha) घडली आहे. जिथे एका पतीने, आपल्याच पत्नीचा काटा काढण्यासाठी एक विचित्र कट रचला. ही घटना उघड झाल्यानंतर पोलिसही चक्रावले. (Odisha Crime Murder News A Man Arrested for killing Wife and daughter by Releasing Cobra Snake into there Room)

हे वाचलं का?

पत्नीचा काट काढण्याचा विचित्र डाव

एखादी व्यक्ती आपल्याच कुटुंबाविरुद्ध, पत्नी आणि मुलीविरुद्ध असा कट कसा रचू शकते? हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. ओडिशातील गंजम जिल्ह्यात पोलिसांना माहिती मिळाली होती की, एका घरात आई आणि तिच्या 2 वर्षीय निरागस मुलीला साप चावला आणि दोघींचा मृत्यू झाला. आई आणि मुलीला साप चावल्यावर कुटुंबीयांनी तात्काळ सापाला मारले. सूर्य नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

वाचा : Ind vs Aus T20 : ‘नो बॉल’वर खेचून आणला विजय; 5 दिवसांत घेतला वर्ल्ड कपचा बदला

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड!

या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीची आणि नातीची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती उघड झाली. आरोपी गणेश पात्राचा विवाह बसंतीसोबत 3 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक मुलगीही होती. गणेश पत्नीवर अनेकदा संशय घेत असे आणि याच कारणामुळे दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.

पत्नी आणि मुलीचा मारण्याचा असा केला प्लान…

गणेशने पत्नी बसंती आणि मुलीला संपवण्याचा प्लान केला. त्याच्या प्लाननुसार, त्याने एका सर्पमित्राकडून कोब्रा (कोल्थिया नाग) विकत घेतला. पत्नी आणि मुलगी ज्या खोलीत झोपलेल्या होत्या तिथे तो साप सोडला. यानंतर दोघींनाही साप चावला. त्यांना तत्काळ हिंजीलाकट शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्याचवेळी हा मृत्यू विषारी सर्पदंशामुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने मृत महिलेच्या वडिलांनी जावयावर आपली मुलगी आणि नातीचा खून केल्याचा आरोप करत तक्रार केली.

वाचा :  ‘कोर्टात आरक्षण टिकत नसेल तर आरक्षण कसले देता?’ कोणी दिलं जरांगे पाटलांना थेट आव्हान?

घटनेबाबत पोलीस अधिकारींनी दिली महत्त्वाची माहिती

कबिसूर्यनगर येथील पोलीस प्रभारी निरीक्षक प्रवत कुमार साहू यांनी सांगितले की, ‘मृत महिला म्हणजेच बसंतीच्या वडिलांनी तक्रार दिली होती. त्यांच्या मुलीला गणेशने सापाने मारले असावे, अशी तक्रार 12 ऑक्टोबर रोजी आमच्याकडे दाखल करण्यात आली होती. यादरम्यान, आम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील मिळाला, ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की त्यांच्या मुलीचा आणि नातीचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला आहे. 6 ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडली. दोघींना साप चावल्यानंतर सकाळपर्यंत साप एकाच खोलीत कसा राहिला असेल, याचा विचार केल्यानंतर संशय निर्माण झाला.’

वाचा : YouTuber चा संशयास्पद अवस्थेत सापडला मृतदेह, धक्कादायक माहिती आली समोर

‘त्या रात्री कुटुंबीयांनी सापाला मारून दोघींनाही रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन अहवालातही मृत्यूचे कारण साप चावल्याचे नमूद करण्यात आले. पण मृत महिलेच्या वडिलांनी केलेल्या आरोपांच्या आधारे आम्ही आमचा तपास सुरू केला. तपासादरम्यान आम्हाला समजले की, आरोपी गणेशने विषारी साप एका सर्पमित्राकडून खरेदी केला होता. सर्पमित्रांकडे चौकशी केली असता गणेशने 6 ऑक्टोबर रोजी घरी विशेष पूजा करण्याच्या बहाण्याने एका सर्पमित्राकडून विषारी साप मागितल्याचे उघडकीस आले. नंतर रात्रीच्या सुमारास त्याने सापाला त्या खोलीत सोडले होते.’

    follow whatsapp