25 वर्षीय तरुणीचे अर्ध जळालेलं मांस खाल्लं, दोघांनी का केलं किळसवाणं कृत्य?

मुंबई तक

13 Jul 2023 (अपडेटेड: 13 Jul 2023, 03:02 PM)

ओडिशातील दोन व्यक्तींनी अंत्यसंस्कार सुरु असतानाच एका 25 वर्षीय तरुणीच्या मृतदेहाचे मांस खाल्ल्याची अत्यंत किळसवाणी घटना घडल्याचं समोर आलं आहे.

Crime News Marathi : two persons ate the flesh of a 25-year-old girl's body while the funeral was in progress in Odisha

Crime News Marathi : two persons ate the flesh of a 25-year-old girl's body while the funeral was in progress in Odisha

follow google news

Crime News: माणूस दिवसेंदिवस हा राक्षसी वर्तणुकीकडे झुकत चाललाय.. याची अनेक उदाहरणं आतापर्यंत समोर आली आहेत. पण आता एक अशी घटना घडली आहे की, ज्याचा आपण कधी विचार देखील केला नसेल. ओडिशातील (Odisha) मयूरभंज जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. जी खरोखरच माणुसकीला देखील काळीमा फासणारी आहे. (odisha crime news very disgusting incident two persons ate flesh of 25 year old girls deadbody part funeral aajcha tajya batmya)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, दोन व्यक्तींनी चक्क अंत्यसंस्कार करताना अर्ध्या जळालेल्या मृतदेहाचे मांस खाल्ले आहे. ही धक्कादायक घटना बंदसही या आदिवासी गावात घडली. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे सुंदर मोहन सिंग ( वय 58 वर्ष) आणि नरेंद्र सिंग (वय 25 वर्ष) अशी आहेत.

नेमकं काय घडलं स्मशानात?

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधसही गावात राहणारी मधुस्मिता सिंह ही 25 वर्षीय तरुणी मागील काही दिवसांपासून आजारी होती. जिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना देण्यात आला. मधुस्मिता हिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आला. यावेळी मधुस्मिताचे काका लबा सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथे उपस्थित असलेल्या दोन मद्यधुंद लोकांनी अर्ध्या जळालेल्या शरीराच्या एका भागाचे तीन तुकडे केले. त्यांनी एक तुकडा सोबत ठेवला आणि बाकीचा आगीत टाकून दिले.

हे ही वाचा >> Kalyan Crime: दोन कॉलगर्ल्सना घरी बोलावलं अन गेला जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

काका लाबा यांनी त्यांना विचारले की तू या मांसाचे काय करणार आहेस, त्यावर सुंदरने सांगितले की, मला काही जादूटोणा माहित नाही. त्यानंतर लाबाने त्याला विरोध केल्यावर त्याने अर्धवट जळालेले मांस खाण्यास सुरुवात केली. यावेळी सुंदरने त्याच्या बरोबर असलेल्या नरेंद्रला देखील मांसाचा तुकडा खायला दिला.

हे ही वाचा >> आईला शेजाऱ्यासोबत पाहिलं नग्नावस्थेत, अन् मुलासोबत घडली थरकाप उडवणारी घटना

यानंतर गावातील लोकांनी या दोघांनाही बेदम मारहाण केली आणि त्यांना स्थानिक पोलिसांना माहिती दिली. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत सुंदर आणि नरेंद्र या दोघांनी हे अमानुष कृत्य मान्य करत मद्यधुंद अवस्थेत मांस खाल्ल्याचे कबूल केले आहे.

    follow whatsapp