Murder News : पती-पत्नीच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वाद नंतर इतका टोकाला गेला की, पतीने थेट पत्नीची हत्याच (Wife Murder) केली. पैठण तालुक्यातील कारकीनमध्ये (Paithan Karkin) क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून पतीने कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे पैठण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या दोघांना एक वर्षाची मुलगी असून मुलीला पत्नीने मारले म्हणून त्या रागाच्या भरात कुऱ्हाडीने घाव (Attack) घालून पत्नीला संपवले आहे. घटनेचे वृत्त पसरताच अनेकांना धक्का बसला. या प्रकरणी पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल झाला असून हत्येप्रकरणी पतीला अटक केले आहे.
ADVERTISEMENT
गळ्यावर, पोटावर घाव
पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारकीनमध्ये आतिष रावसाहेब ताकवाले (वय 30) आणि त्याची पत्नी सोनाली आतिष ताकवाले ही दोघं आणि त्यांची एक वर्षाची लहान मुलगी राहत होती. ज्या दिवशी सोनालीची हत्या झाली त्यादिवशी सोनालीने त्यांच्या मुलगीला तिने मारले होते. त्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्या वादातूनच रागाच्या भरात आतिषने सोनालीवर कुऱ्हाडीने घाव घालून तिची हत्या केली होती. सोनालीच्या गळ्यावर आणि पोटावर सलग कुऱ्हाडीने घाव केल्यामुळे सोनाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
हे ही वाचा >>मेकॅनिकल इंजिनिअरने घातला कोट्यवधींचा गंडा, आरोपीच्या कारनाम्याने चक्रावले पोलीस
घरात रक्ताचा सडा
आतिषने सोनालीबरोबर वाद घालून नंतर रागाच्या भरात कुऱ्हाडीने तिच्यावर घाव घातला होता. त्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आतिष पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना तालुक्यात समजताच खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरुन पत्नीला तोडलं का असा सवाल आता उपस्थित केला जात असून हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
हे ही वाचा >> Crime : लव्ह, सेक्स आणि धोका! ब्रेकअपनंतर अश्लील व्हिडीओ बनवून..,तरूणीसोबत काय घडलं?
पैठण तालुक्यातील कारकीनमध्ये ही घटना घडल्याचे लक्षात येताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश केळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, कर्तारसिंग सिंघल, राजेश चव्हाण, जमादार पो. हे कॉ. गोपनीय विभागाचे कृष्णा उगले यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांनी आतिषला ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT