Palghar Murder : पालघर जिल्ह्यात एका आठ वर्षाच्या मुलीची हत्या (Girl Murder) करण्यात आल्याने जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतर हत्येचं कारण समजताच पोलिसांनाही धक्का बसला आहे. लहान मुलगी चिडवत असल्याच्या रागातून किशोर नावाच्या मुलाने तिची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर ही घटना कोणालाही समजू नये म्हणून मुलीच्या मृतदेहाची (Dead Body) विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली मुलाच्या वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील पेल्हारमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT
…अन् मुलगी बेपत्ता
वसई तालुक्यातील पेल्हार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाती आरोपी किशोर हा 16 वर्षांचा आहे. गेल्या शुक्रवारी मुलगी आईस्क्रीम घेण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर मुलगी पुन्हा घरी परतलीच नव्हती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली.
हे ही वाचा >> सैराट… ऑनर किलिंगच्या घटनेने राज्य हादरलं, बहिणीचे भावाने कोयत्यानेच केले तुकडे!
मृतदेह पिशवीत सडला
त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला, मात्र मुलगी सापडलीच नव्हती. पोलिसांचा शोध सुरू असतानाच 4 डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी मुलगी राहत होती, त्याच चाळीतील एका रिकाम्या खोलीत प्लास्टिकच्या पिशवीत मुलीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी किशोर आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले.
मुलगी सतत चिडवायची
या हत्येप्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन असून त्याने पोलिसांसमोर घडलेल्या घटनेचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मुलगी मला चिडवत होती. त्यादिवशीही मला तिने चिडवले होते. त्यामुळे तिला अद्दल घडवण्यासाठी तिला शिक्षा द्यायची होती.
मुलगी 1 डिसेंबर रोजी आईस्क्रीम घेण्यासाठी घरातून एकटीच बाहेर पडली होती. त्या संधीचा फायदा घेण्यासाठी त्या मुलाने तिला ओढून आपल्या घरी घेऊन गेला. त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली.
वडिलांचं भयानक धाडस
तिची हत्या झाल्यानंतर तिचा मृतदेह मुलाच्याच घरी पडून होता. त्यानंतर त्याच्या वडिलाने मुलीच्या मृतदेहाची वाट लावण्याचा प्रयत्न करत मुलीला एका पिशवीत घालून त्याने एका खोलीत तिचा मृतदेह ठेवला. त्यामुळे मुलाच्या वडिलानाही या प्रकरणी आता ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT