DRDO Scientist Pradeep Kurulkar Chat : डीआरडीओचा संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत. पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ताला गोपनीय माहिती दिल्याचे चॅट समोर आल्यानंतर कुरुलकरचे आणखी एका महिलेशी विवाह्य संबंध असल्याचे समोर आले आहे. एक कंत्राट मिळवून देण्यासाठी कुरूलकरने महिलेशी संबंध प्रस्थापित केल्याचे एटीएसने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आले आहे. (drdo scientist pradeep kurulkar have extra marital affairs with a women)
ADVERTISEMENT
प्रदीप कुरूलकरने हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला अतिसंवेदनशील माहिती पुरवल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी तपास यंत्रणांनी प्रदीप कुरूलकरला अटक केली असून, या प्रकरणाचा सर्वांगाने तपास केला जात आहे.
कुरुलकरचे महिलेशी विवाहबाह्य संबंध
दरम्यान, एटीएस अर्थात राज्य दहशतवादी विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात असून, एटीएसने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रातून प्रदीप कुरुलकरचे आणखी एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. या महिलेने मात्र, कोणतीही तक्रार पोलिसांकडे दिली नसल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे.
Nashik Accident : सप्तश्रृंगी गडावर कठडा तोडून प्रवासी बस कोसळली घाटात, पहा Video
डीआरडीओतील विविध कामांचे कंत्राट मिळवून देण्यासाठी प्रदीप कुरूलकरने एका महिलेशी संबंध प्रस्थापित केले आहेत. कुरुलकर आणि त्या महिलेमध्ये झालेल्या संभाषणाचे चॅटही एटीएसला मिळाले आहेत. तसा उल्लेख एटीएसने आरोपपत्रात केला आहे. कुरुलकरला अटक झाल्यानंतर त्याला गेस्ट हाऊसला भेटायला आलेल्या महिलांची चौकशी करण्यात आली.
वाचा >> Sharad Pawar: दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात पवारांचा ‘हा’ शिलेदार उभं करणार आव्हान?
देशाच्या सुरक्षेसंदर्भातील अतिगोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला दिल्या प्रकरणात कुरुलकर अटकेत आहे. एटीएसने कुरुलकर विरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात एक हजार 837 पानांचे आरोपपत्र अलीकडे दाखल केले.
झारा दासगुप्ताच्या जाळ्यात अडकला अन्…
एटीएसच्या माहितीप्रमाणे प्रदीप कुरुलकर हा पाकिस्तानी हेर असलेल्या झारा दासगुप्ताच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. कुरुलकरने झाराला अग्नि, ब्रह्मोस, रुस्तम या क्षेपणास्त्राविषयी चर्चा केली. तसेच त्याच्या संशोधनाबद्दलची माहिती दिली. कुरुलकरने आणि झारा दासगुप्ता यांच्यातील संभाषणाचे चॅट्सही एटीएसने न्यायालयासमोर सादर केली आहे. त्यामुळे कुरुलकरच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT