Pune Crime: 13 वर्षीय मुलीवर अल्पवयीन मित्राकडून बलात्कार, दारू पाजली अन् नंतर...

मुंबई तक

23 Aug 2024 (अपडेटेड: 23 Aug 2024, 05:12 PM)

Pune Rape Case: पुण्यात एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 2 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

13 वर्षीय मुलीवर अल्पवयीन मित्राकडून बलात्कार

13 वर्षीय मुलीवर अल्पवयीन मित्राकडून बलात्कार

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात 13 वर्षाच्या मुलीवर 17 वर्षाच्या मुलाकडून बलात्कार

point

आरोपीने पीडितेला मित्राच्या घरी पार्टीचे आमिष दाखवून जबरदस्ती पाजली दारू

point

2 अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात, इतर 2 जण फरार

Pune Minor Girl Rape: पुणे: अवघ्या देशाला हादरवून टाकणारी बदलापूर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना समोर आलीए. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून, प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच दोन अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेतलं असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. (pune crime 13 year old minor girl forced to drink alcohol and then raped by friend video shot of incident)

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी मुलगा 17 वर्षांचा आहे. 15 एप्रिल रोजी मुलीवर बलात्कार झाला होता. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी काल (22 ऑगस्ट) पोलिसांत तक्रार केली आहे.

हे ही वाचा>> अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला! लैंगिक अत्याचार करून खून झाल्याचा संशय, कोल्हापूरमध्ये नेमकं काय घडलं?

तक्रारीत म्हटले आहे की, 13 वर्षीय मुलीचे मित्र आणि इतर लोकांनी मुलीला फूस लावून मित्राच्या घरी पार्टीत नेले. तिथे त्यांनी तिला जबरदस्ती दारू पाजली. त्यानंतर मुलगी दारूच्या नशेत असताना तिच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीसोबत उपस्थित असलेल्या एकाने त्याच्या मोबाइलवरून या घटनेचा व्हिडीओ देखील शूट केला.

या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले. याप्रकरणी इतर दोन जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सगळ्यात त्यांना मदत करणारी एक अल्पवयीन मुलगी देखील असल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा>> Badlapur: 'अक्षय शिंदेचं 4 महिन्यापूर्वीच दुसरं लग्न झालेलं, पहिली बायको...', समोर आली नवी माहिती

या संपूर्ण प्रकरणाबाबत समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गीते यांनी सांगितले की, तिसरा आरोपी आणि त्याच्या मैत्रिणीचा शोध सुरू आहे. या संपूर्ण घटनेबाबत एकूण 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल गोराड तपास करत आहेत.

    follow whatsapp