Pune Crime News : पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून (Pimpari Chinchwad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बायकोनेच पतीवर सशस्त्र हल्ला घडवून आणत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आता पत्नी रत्ना बरूड हिला अटक करण्यात आली आहे. रत्नासह या हत्येत सामील असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना देखील पोलिसांनी (Police) अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात रत्नाने नवऱ्याला (Husband) जीवे मारण्याचा प्रयत्न का केला? हे जाणून घेऊयात. (pune crime news wife try to killed her husband torture and 8 girl planning for second marriage shocking crime story)
ADVERTISEMENT
पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आकुर्डी परिसरात मिठाईलाल बरूड यांचे कुटुंब राहते. मिठाईलाल यांचे लग्न रत्ना बरूड या महिलेशी झाले होते. या लग्नापासून दोघांना आठ मुली होत्या. पण बरूड यांना वंशाचा दिवा नव्हता. त्यामुळे मिठाईलाल बरूड यांची पत्नी रत्नासोबत सतत भांडणे व्हायची. या भांडणातून मिठाईलाल रत्नाला मारायचा तिचा छळ करायचा. तसेच गेल्या काही महिन्यांपासून मिठाईलाल दुसऱ्या लग्नाचीही तयारी देखील करत होता. या गोष्टीला रत्नाचा नकार होता त्यामुळे यातूनच रत्नाने मिठाईलालच्या हल्ला करण्याचा कट रचला होता.
हे ही वाचा : Lok sabha Security Breach : सैन्यात भरती होणार होता, पण… कोण आहे अमोल शिंदे?
ठरल्यानुसार 7 डिसेंबरला रात्री 9 वाजताच्या दरम्यान रत्ना घराबाहेर पडली. त्यानंतर तिने आरोपींना मिठाईलाल घरात झोपल्याची माहिती दिली. यानंतर धारदार शस्त्रांसह सराईत गुन्हेगार घरात घुसले आणि त्यांनी मिठाईलालवर हल्ला चढवला. या घटनेच्या वेळेस मिठाईलालच्या मुली देखील घरी होत्या. त्यामुळे वडिलांवर सशस्त्र हल्ला होत असल्याचे पाहून मुलींनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळ गाठत मिठाईलालला रूग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी मिठाईलालच्या एका मुलीने पोलिसांना आरोपींची ओळख सांगितली. कारण ते त्यांच्या शेजारीत राहायचे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवून सराईत गुन्हेगार अमन पुजारी आणि शिवम दुबे यांना अटक केली होती. या अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता, त्याने मुख्य आरोपीचे नाव सांगण्यास नकार दिला. यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच आरोपींनी मिठाईलाल दुबेची पत्नी रत्ना दुबेच या प्रकरणातली मुख्य आरोपी असल्याची माहिती दिली.
हे ही वाचा : Lok sabha Security : अमोल शिंदेसह तिघं चांगलेच फसले, दाखल झाला UAPA!
यानंतर पोलिसांनी रत्ना दुबे यांची चौकशी केली असता सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. यानंतर कसून चौकशी केली असता घटनेची कबूली दिली. मिठाईलाल आणि त्यांना आठ मुली होत्या. घरात वंशाचा दिवा नव्हता म्हणून मिठाईलालला मुलगा हवा होता. तो मुलगा रत्नाकडून होत नसल्याने त्याने दुसऱ्या लग्नाचा विचार सूरू केला होता. यानंतर रत्नाने मिठाईलालच्या जीवे मारण्याचा कट रचला होता.
या प्रकरणी आता पोलिसांनी सराईत गुन्हेगार अमन पुजारी आणि शिवम दुबे यांना अटक केली आहे. त्यासोबत या घटनेतला मुख्य आरोपी रत्ना बरूड यांनाही अटक केली. या प्रकरणाचा निगडी पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT