Pune Accident : 'ते' तीन लाख रुपयेही पुणे पोलिसांनी केले जप्त!

रोहिणी ठोंबरे

28 May 2024 (अपडेटेड: 28 May 2024, 04:55 PM)

Pune Porsche Car Accident : पुण्यातील पोर्शे कार ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात पोलीस एकामागून एक नवीन खुलासे करत आहेत. आता या प्रकरणात ससून रुग्णालयाचे सीएमओ हरी हरनोळ याच्याकडून पैसे घेतलेल्या अतुल घाटकांबळे याच्याकडून गुन्हे शाखेने तीन लाख रुपये जप्त केले आहेत.

Mumbaitak
follow google news

Porsche Car Accident in Pune : पुण्यातील पोर्शे कार ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात पोलीस एकामागून एक नवीन खुलासे करत आहेत. आता या प्रकरणाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. ससून रुग्णालयाचे सीएमओ हरी हरनोळ याच्याकडून पैसे घेतलेल्या अतुल घाटकांबळे याच्याकडून गुन्हे शाखेने तीन लाख रुपये जप्त केले आहेत. आरोपी डॉक्टर आणि आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना गुन्हे शाखेच्या कार्यालयातून लष्कर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. (Pune Porsche Accident  3 lakh taken for blood sample exchange seized from the sasun hospital accused)

हे वाचलं का?

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ससून रुग्णालयाचे सीएमओ श्रीहरी हरनोळ यांच्याकडून पैसे घेतलेल्या अतुल घाटकांबळे याच्याकडून गुन्हे शाखेच्या पथकाने अडीच लाख रुपये जप्त केले आहेत. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने हरनोळकडे चौकशी करून उर्वरित 50 हजार रुपयांची माहिती घेतली. त्यानंतर पथकाने शोधमोहीम राबवून घाटकांबळे यांच्याकडून उर्वरित 50 हजार रुपयांचीही रोकड जप्त केली.

हेही वाचा : BJP-काँग्रेस किती जागा जिंकणार? 'यांनी' सांगितला फायनल आकडा!

रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप

ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ.अजय तावरे, सीएमओ डॉ. श्रीहरी हरनोळ यांच्या हाताखाली काम करणारे अतुल घाटकांबळे यांना पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी सांगितले की, अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी डॉक्टरांना बोलावून रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितले होते. यावेळी, त्याच्या रक्ताचा नमुना एका व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्याने बदलण्यात आला. ज्याने अल्पवयीन आरोपीने दारूचे सेवन केले नव्हते हे सिद्ध करायचं होतं.

हेही वाचा : भाजपला महाराष्ट्र-कर्नाटकात बसणार झटका? सरदेसाईंचा अंदाज काय?

नेमकं प्रकरण काय? 

ड्रंक अँड ड्राइव्हची ही घटना 19 मे रोजी घडली होती. पुण्यातील कल्याणीनगर भागात रिअल इस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल याच्या 17 वर्षीय मुलाने दोन दुचाकीस्वार (तरूण आणि तरूणी) इंजिनीअर्सना त्याच्या स्पोर्ट्स कार पोर्शने चिरडले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर 14 तासांच्या आतमध्ये, आरोपी अल्पवयीन व्यक्तीला काही अटींसह न्यायालयातून जामीन मिळाला, न्यायालयाने त्याला 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचे निर्देश दिले होते. 

हेही वाचा : Ravindra Dhangekar : "तुम्ही पुणे उद्ध्वस्त केलंय, लाज कशी...", धंगेकरांचा रुद्रवतार!

मात्र, आरोपी दारूच्या नशेत असून सुसाट वेगाने कार चालवत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन सध्या सुधारगृहात आहे. नुकतेच या घटनेत सहभागी असलेल्या दोन पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप झाला होता. 

घटनेनंतर हे दोन अधिकारी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. मात्र दोघांनीही या घटनेची माहिती वरिष्ठांना आणि नियंत्रण कक्षाला दिली नाही. येरवडा पोलीस ठाण्याच्या या दोन पोलीस अधिकाऱ्यांना पुणे आयुक्तांनी निलंबित केले. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि एपीआय विश्वनाथ तोडकरी अशी त्यांची नावे आहेत.

    follow whatsapp