Pune Porsche Accident : ओंकार वाबळे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात दररोज नव-नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील दोन जणांना कारखाली चिरडणारा बिल्डरपुत्र व अल्पवयीन आरोपी सध्या बालसुधारगृहात आहे. या अल्पवयीन आरोपीची आता चौकशी होणार आहे. पुणे पोलिसांना (Pune Police) बाल न्याय मंडळाने याबाबत चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्या पुणे पोलीस या अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहे. या चौकशीतून आता नेमका काय उलगडा होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (pune porsche accident pune police demand inquiry minor accuse juvenile justice approve pune accident)
ADVERTISEMENT
पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपींच्या चौकशीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे केली होती. या मागणीला आता बाल न्याय मंडळाकडे परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्या पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहेत. अल्पवयीन आरोपींची चौकशी करण्यासाठी पोलिसांना २ तासांचा वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ् पोलीस अधिकाऱ्यांनी एनआयला दिली आहे.
हे ही वाचा : अजित पवारांच्या दोन नेत्यांमध्ये पडली ठिणगी, कारण ठरले आव्हाड!
दरम्यान या प्रकरणा आज अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंग्र अग्रवाल यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी मंगळवारी न्यायालयाने त्यांची कोठडी 31 मे पर्यंत वाढवली होती. गेल्या सुनावणीत पोलिसांनी कोर्टात सांगितले की, सुरेंद्र अग्रवालने कार चालकाचे अपहरण करून त्याला बंगल्यावर नेले आणि तेथे त्यांनी कार अपघाताचा दोष स्वतःवर घेण्यासाठी दबाव टाकला. या संबंधित आम्ही काही सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.
या प्रकरणावर अमितेश कुमार म्हणाले होते की, रात्री ड्रायव्हर पोलिस स्टेशनमधून निघाल्यानंतर आरोपी सुरेंद्र अग्रवाल याने त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला त्याच्या राहत्या घरी कोंडून ठेवले आणि ड्रायव्हरवर दोष घेण्यासाठी दबाव टाकला होता. त्यानंतर चालकाच्या कुटुंबियानी त्याचा शोध घेतला असता अग्रवाल यांच्या निवासस्थानी त्याची सुटका झाली होती. तेव्हापासून चालक घाबरला होता. क्राईम ब्रँचने चालकाचा जबाब घेतला होता. त्यानंतर विशाल अग्रवालला अटक झाली होती.
ADVERTISEMENT