Pune psi Suspended threatening girlfriend husband : पुण्यातील पोलिस उपनिरीक्षक प्रवीण नागेश जरडे यांच्यावर निलंबनाची (psi Suspended) कारवाई करण्यात आली आहे. गर्लफ्रेंडच्या घरी जावून तिच्या नवऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई आल्याची माहिती आहे. ही घटना समोर आल्यानंतर पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी प्रवीण जरडे यांच्यावर निलंबनाची (psi Suspended) कारवाई केली आहे. या निलंबनानंतर प्रवीण जरडे यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान प्रविण जरडे यांच्यावर नेमके आरोप काय आहेत? आणि हे संपुर्ण प्रकरण काय आहे? ते जाणून घेऊय़ात. (pune psi pravin jarade suspended allegations of intimidation by going to the house with a pistol)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
पोलिस उपनिरीक्षक प्रवीण नागेश जरडे यांच्यावर पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आणि घरी येऊन पिस्तुल (Pistol) रोखून धमकावल्याचा आरोप केला जात आहेत. या आरोपानंतरच त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.
फिर्यादी पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जरडे यांचे फिर्यादीच्या पत्नीशी अनैंतिक संबध होते. या सबंधातून जरडे हे पत्नीला फिर्यादी पतीला सोडण्यासाठी दबावही टाकत होते. या प्रकरणात फिर्यादी पतीने थेट प्रवीण जरडे यांना पत्नीशी असलेल्या संबंधाची विचारणा करत विरोध दर्शवला. फिर्यादी पतीच्या विरोधानंतर प्रविण जरडे यांनी घरात जाऊन पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप केला होता.
प्रविण जरडे यांनी फिर्यादीच्या कोथरूड (Kothrud) येथील एका सोसायटीतील घरी घुसुन पिस्तुल (Pistol) रोखून धमकावण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता घडली होती.प्रविण जरडे यांच्या धमक्यांमुळे पीडित मुलगी आणि त्याचे कुटुंब प्रचंड घाबरले होते.
पण अखेरीस 43 वर्षीय फिर्यांदीने जरडे यांना न घाबरता कोथरूड (Kothrud) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनंतर शिवाजीनगर न्यायालयात सध्या कार्यरत असलेले पीएसआय जरडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर आता अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी प्रविण जरडे यांना पोलीस दलातून निलंबित केले आहे. या निलंबनाने प्रविण जरडे यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT