Pune Crime News : पुण्यात दोन चिमुकल्या बहिणींचा खून, पाण्याच्या टाकीत सापडले मृतदेह, नागरिकांचा संताप

पोलिसांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेतल्यावर बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली गेली, तेव्हा गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये दोन्ही मुलींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळुन आले.

Mumbai Tak

मुंबई तक

26 Dec 2024 (अपडेटेड: 26 Dec 2024, 12:52 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कल्याण पाठोपाठ पुण्यातही संतापजनक घटना

point

दोन चिमुकल्या बहिणींची हत्या

point

परप्रांतीय कामगारांच्या घरात सापडला मृतदेह

Pune Crime News : कल्याणमध्ये 13 वर्षाच्या मुलीच्या अपहरण आणि हत्येची घटना ताजीच असताना आता पुण्यातील एका घटनेनं महाराष्ट्राला हादरवलं आहे. या घटनेमध्ये दोन चिमुकल्या बहि‍णींचीच हत्या करुन मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत फेकून दिल्याचं आढळलं आहे. या घटनेनं आता पुन्हा एकदा जनतेमध्ये संताप निर्माण झाल्याचं दिसतयं. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरात बुधवारी 25 डिसेंबर रोजी दुपारी बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्या मुलींची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sambhajinagar Clerk Scam : कंत्राटी कर्मचाऱ्यानं संभाजीनगरमध्ये 21 कोटींचा घोटाळा कसा केला? नेमका काय झोल केला?

खेड तालुक्यातील वाडा रोडवर एका मोठया वर्दळीच्या रस्त्यावर हे कुटुंब राहत होतं. याच भागात परप्रांतीय मुलांच्या एका खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह आढळून आले अशी माहिती आहे. बुधवारी दुपारी दोघी घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या पालकांनी त्या गायब झाल्यावर सायंकाळी राजगुरूनगर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यांचे आई वडील मोलमजुरी करत होते.

दरम्यान, पोलिसांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेतल्यावर बारमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या खोलीची झडती घेतली गेली, तेव्हा गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये दोन्ही मुलींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळुन आले.

हे ही वाचा >> Navi Mumbai Car Accident : दोन कारची धडक, एअरबॅग उघडल्या अन् मानेला झटका बसल्यानं चिमुकल्याचा मृत्यू...

राजगुरुनगर पोलीसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले असून, बेपत्ता झालेल्या या दोन मुलींसोबत काय झाले याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान राजगुरूनगर येथील धनराज बारमधील वेटरने हे खून केले असून, पहाटे 4 च्या सुमारास पुण्यातील एका लॉज वरून त्याला अटक केली आहे. संशयित आरोपी 50 ते 55 वर्ष वयाचा आहे.

    follow whatsapp