Marathi News Latest: पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यातील शिक्रापूर येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीच्या प्रियकराच्या (Boyfriend) साथीने पतीचीच निर्घृण हत्या (Husband Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर हत्या केल्यानंतर पतीचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचाही पत्नीने प्रयत्न केला. अखेर या प्रकरणी आरोपी पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. (pune wife husband murder minor daughter bofriend crime news)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथे जॉय लोबो या व्यक्तीची त्याची पत्नी सॅन्ड्रा लोबो आणि तिच्या अल्पवयीन मुलीचा बॉयफ्रेंड अॅग्नेल कसबे यांनी मिळून हत्या केली होती. या घटनेतील आरोपी अॅग्नेल कसबे आणि अल्पवयीन मुलीचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते.
पण याच प्रेमसंबंधाला अल्पवयीन मुलीची आई सॅन्ड्रा लोबो हिची संमती होती. परंतु तिचे वडील म्हणजेच जॉय लोबो याचा विरोध होता. त्यामुळे पत्नी सॅन्ड्रा लोबो आणि जॉय लोबो यांच्यात नेहमी वाद होत होते. आपल्या मुलीच्या प्रेमात तिचे वडील अडथळा ठरत आहेत त्यामुळे त्याला कायमचा दूर करण्याच्या उद्देशाने सॅन्ड्राने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला.
हे ही वाचा >> Bhagirath Bhalke : शरद पवारांचा सोलापुरातील नेता ‘केसीआर’ यांनी फोडला
मात्र, हा कट रचण्यासाठी सॅन्ड्राने सुरुवातीला वेगवेगळ्या क्राइम वेब सीरीज पाहिल्या. त्यानंतर तिने पतीच्या हत्येचा कट रचला. सॅन्ड्रा आणि अॅग्नेल यांनी संगनमत करून मयत जॉय लोबो याचा 30 मे 2023 रोजी रात्रीच्या सुमारास घरातच डोक्यात वरवंटा घालून निर्घृण हत्या केली. दोन्ही आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी जॉयच्या मानेवर चाकूने सपासप वार करून त्याला जागीच ठार केलं.
त्यानंतर हत्या केलेल्या जॉयचं प्रेत हे घरातच ठेवलं. त्यानंतर जॉयच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून या प्रकरणातील संपूर्ण पुरावाच नष्ट करण्याच्या हेतूने 31 मे 2023 रोजी रात्रीच्या वेळी मृतदेह कारमध्ये टाकून त्यांनी गाडी सणसवाडीच्या दिशेने नेलं. त्यानंतर जवळच्या एचपी पेट्रोल पंपाच्या अलीकडे पुणे-अहमदनगर हायवे रोडलगत कार थांबवून मयतास हायवे रोडलगतच्या नाल्यात टाकून त्याचेवर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिलं.
हे ही वाचा >> एकाच वेळी सुरू होतं तीन मुलींसोबत गॅटमॅट, बॉयफ्रेंडची एक चूक अन्…
मात्र, जॉयचा मृतदेह पूर्णपणे जळला नसल्याने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ज्यासाठी पोलिसांनी तब्बल 230 सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. ज्यामध्ये पोलिसांना काही महत्त्वाची मिळाली आणि पोलीस थेट जॉयची पत्नी सॅन्ड्रापर्यंत पोहचले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचं सत्य समोर आलं. याचप्रकरणी सॅन्ड्रानंतर दुसरा आरोपी अॅग्नेल कसबे याला देखील अटक करण्यात आली. आता पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT