Raid by fake ED officers in Zaveri Bazar :
ADVERTISEMENT
मुंबई : ‘स्पेशल 26’ चित्रपटात शेवटी बनावट अधिकाऱ्यांनी ज्याप्रकारे सोन्याच्या दुकानात छापा टाकून लूट केली होती, अगदी त्याप्रकारची घटना मुंबईतील झवेरी बाजारात घडली आहे. ईडीचे अधिकारी बनून आलेल्या चार जणांच्या टोळीने एका सोन्याच्या दुकानावर छापा टाकून तब्बल २५ लाख रुपये रोख रक्कम आणि ३ किलो सोन्यावर हात साफ केला आहे. (Raid by fake ED officers in Zaveri Bazar)
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी (२४ जानेवारी) सकाळी झवेरी बाजार परिसरात चौघे जण ईडीचे अधिकारी बनून आले होते. यावेळी या टोळक्याने एका व्यापाऱ्याच्या ऑफिसवर आपण ईडीचे अधिकारी असल्याच सांगत छापेमारी सुरु केली. फोन आणि अन्य गोष्टी ताब्यात घेतल्या.
या दरम्यान, टोळक्याने २५ लाख रुपये रोख रक्कम आणि ३ किलो सोन्यावर हात साफ केला. या सोन्याची अंदाजे किंमत ७० लाख रुपये असल्याच सांगण्यात येत आहे. तसंच छाप्यावेळी दुकानातील एका कर्मचाऱ्याला बेड्याही घातल्या होत्या. या प्रकरणामुळे झवेरी बाजारत मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी चार अज्ञात दरोडेखोरांविरोधात भारतीय दंड विधान कलम 394, 506 (2) आणि 120 B या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा तपास सुरु केला आहे.
ADVERTISEMENT