‘तुम्हारा बाप बोल रहा हूँ’,आमदार सुर्वेंच्या कार्यालयात CEO सोबत काय घडलं?

मुंबई तक

10 Aug 2023 (अपडेटेड: 10 Aug 2023, 01:31 PM)

मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह 15 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका व्यक्तीचे अपहरण केल्या प्रकरणी हा गुन्हा दाळ करण्यात आला आहे.

mumbai police filled case against raj surve who is son of mla prakash surve.

mumbai police filled case against raj surve who is son of mla prakash surve.

follow google news

-दिपेश त्रिपाठी, मुंबई

हे वाचलं का?

Raj surve, son of mla prakash surve : शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप राज सुर्वेवर असून तक्रारदाराने केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात घडलं.

राजकुमार जगदीश सिंग यांचं अपहरण केल्याचा गुन्हा राज सुर्वेवर दाखल झाला आहे. ते ग्लोबल म्यूझिक कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आदिशक्ती म्यूझिक कंपनीच्या मनोज मिश्रा याला सिंग यांच्या कंपनीने 2019 मध्ये 8 कोटींचे कर्ज दिले होते. यासाठी आदिशक्ती प्रा. लि. कंपनीचे लायसन्स तारण ठेवलं होतं.

कार्यालयातून केलं अपहरण

मनोज मिश्रा याने कर्जाची रक्कम कंपनीत न गुंतवता इतर ठिकाणी खर्च केली. त्यानंतर राजकुमार सिंग यांच्यावर करार रद्द करण्यासाठी दबाव टाकू लागला.

संबंधित वृत्त >> Raj surve : आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाविरुद्ध म्युझिक कंपनीच्या सीईओचं अपहरण केल्याचा गुन्हा

यातच राजकुमार सिंग यांना बुधवारी (9ऑगस्ट) दुपारी 3.15 वाजता एक कॉल आला. सिंग यांनी कोण बोलतंय असं विचारलं असता. समोरच्या व्यक्तीने ‘मै तुम्हारा बाप बोल रहा हूँ. तुम अभी इधर आ जाओ’, असं उत्तर दिलं. सिंग यांनी त्याला शनिवारी येतो असं सांगितलं.

10-15 जण कार्यालयात घुसले अन घेऊन गेले

जयकुमार सिंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कॉल कट केल्यानंतर 10-15 जण त्यांच्या कार्यालयात घुसले. ‘तेरे को तेरा बाप बुला रहा है और तू टाइम दे रहा है’ असं म्हणत मारहाण केली आणि ते बळजबरी सिंग यांना सोबत घेऊन गेले.

सिंग यांना घेऊन जात असताना पद्माकर नावाच्या व्यक्तीने सिंग यांच्या कमरेवर बंदूक लावली आणि बॉस बोलतोय तर कळत नाही का असं धमाकावलं. त्यानंतर ते लोक सिंग यांना पश्चिम द्रुतगती महामार्गावरून युनिव्हर्सल स्कूलच्या बाजूला असलेल्या प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयात घेऊन गेले.

प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयात काय घडलं?

जयकुमार सिंग यांना कार्यालयात नेण्यात आले. तिथे मनोज मिश्रा, राज सुर्वे आणि इतर काहीजण बसलेले होते. राज सुर्वे जयकुमार सिंग यांना म्हणाला की, ‘मनोज मिश्रा का जो मॅटर है ओ सॉल्वह कर दो. नहीं तो इधर ही बिठाके रखुंगा, जब तक मॅटर सॉल्वह नही हाता. तब तक नहीं छोडुंगा.’

त्याचवेळी राज सुर्वेला एक कॉल आला आणि त्याने इतरांना दुसरीकडे जाण्यास सांगितले. मिश्रा, पद्माकर आणि इतर लोक जयकुमार सिंग यांना दुसऱ्या बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर घेऊन गेले. तोपर्यंत सिंग यांना पोलिसांना कॉल आला.

संबंधित वृत्त >> Congress: तुम्हाला माहितेय राहुल गांधींनी लोकसभेत नेमके कोणते पोस्टर दाखवले?

त्यानंतर सिंग यांच्यावर मनोज मिश्रा आणि इतरांनी 100 रुपयांच्या बॉण्ड पेपरवर सही करण्यासाठी दबाव टाकला. कमरेला बंदूक लावून त्यांनी करार ग्लोबल म्युझिक आणि आदिशक्ती प्रा.लि. मधील करार रद्द झाल्याच्या बॉण्डपेपरवर सह्या घेतल्या.

महिलेच्या प्रकरणात अडकवणार

सह्या घेतल्यानंतर याबद्दल कोणतीही वाच्यता करू नये अशी धमकी आरोपींनी दिली. त्याचबरोबर बाजूच्या रुममध्ये असलेल्या महिलांकडे बोट दाखवून महिलेच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्याचबरोबर मनी लॉडरिंग खोट्या केस करू अशी धमकी मिश्राने दिली. त्यानंतर सिंग यांना रिक्षात बसवून दिले.

    follow whatsapp