Salman khan : सलमान खानच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या

मुंबई तक

• 08:38 PM • 01 May 2024

Salman Khan Firing Case : सलमान खानच्या घरावर हल्ला करण्यासाठी शस्त्र पुरवणाऱ्या दोन आरोपींना आठवड्यापूर्वीच पंजाबमधून अटक करण्यात आली होती. सोनू सुभाष चंद्र (वय 37) आणि अनुज थापण (वय 32) अशी या दोन आरोपींची नावे होती. या दोन्ही आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणातील अनुज थापण या आरोपीने तुरुंगात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

salman khan firing case weapon supplier anuj thapan suicide in jail lowrence bhishnoi brother anmol bishnoi

अनुज थापण याने तुरुंगाच्या बाथरूममध्ये जाऊन चादरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.

follow google news

Salman Khan Firing Case : बॉलिवुड अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला करण्यासाठी शस्त्र पुरवणाऱ्या एका आरोपीने तुरुंगात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनुज थापण  (Anuj Thapan) (32) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीने तुरुगांच्या बाथरुममध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले आहे. (salman khan firing case weapon supplier anuj thapan suicide in jail lowrence bhishnoi brother anmol bishnoi) 

हे वाचलं का?

सलमान खानच्या घरावर हल्ला करण्यासाठी शस्त्र पुरवणाऱ्या दोन आरोपींना आठवड्यापूर्वीच पंजाबमधून अटक करण्यात आली होती. सोनू सुभाष चंद्र (वय 37) आणि अनुज थापण (वय 32) अशी या दोन आरोपींची नावे होती. या दोन्ही आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणातील अनुज थापण या आरोपीने तुरुंगात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

हे ही वाचा : निकालाआधीच काँग्रेसने गमावल्या दोन जागा, महाराष्ट्रात थोडक्यात वाचली!

अनुज थापण याने तुरुंगाच्या बाथरूममध्ये जाऊन चादरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. बाथरूममध्ये गेल्यानंतर खूप वेळ होऊन सुद्धा अनुज बाहेर न आल्याने पोलिसांना संशय झाला. आणि त्याने बाथरूमचा दरवाजा उघडताच अनुज गळफास घेतलेल्या अवस्थेत पडला होता. पोलिसांनी त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनुज हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता. तो ट्रक हेल्पर म्हणून काम करतो. मुंबई गुन्हे शाखेने सुरतमधील तापी नदीतून एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे जप्त केली होती. 14 एप्रिल रोजी सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारासाठी वापरण्यात आलेली ही तीच शस्त्रे होती, असा  दावा आहे. त्यामुळे ही शस्त्रे अनुज आणि सुभाषने पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. 15 मार्च रोजी गोळीबार करणाऱ्या आरोपी विकी आणि सागरला अनुज आणि सुभाषने दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे दिली होती.

हे ही वाचा : Bharat Gogawale : ''घरच्या बाईमुळे शिवसेना फुटली'',

या प्रकरणात पोलिसांनी बिश्नोई टोळीचे दोन शूटर विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना गुजरातमधून अटक केली होती. तर या दोघांना शस्त्र पुरवणारे सोनू सुभाष चंद्र आणि अनुज थापण यांना देखील अटक केली होती. आता मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींवर मकोका कायदा लागू केला आहे. तसेच या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत. 
 

    follow whatsapp