Shahbad Dairy Case Sakshi murder : दिल्लीसह देशाला हादरवून टाकणाऱ्या शाहबाद डेअरी हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेल्या साक्षीसोबत हत्येपूर्वी शारीरिक संबंध ठेवले गेले होते, असं FSL रिपोर्टमधून समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात 28 मे रोजी साक्षी नावाच्या मुलीची रात्री 8.30 वाजता तिच्या साहिल नावाच्या मित्राने हत्या केली होती. अनेक लोकांच्या समोर साहिलने तिची हत्या केली होती. साहिलने आधी साक्षीवर चाकूने वार केले आणि नंतर दगडाने ठेचून मारले.
हत्येपूर्वी मुलीशी ठेवण्यात आले होते संबंध
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरॅटरी अर्थात न्यायवैद्यक शास्त्र प्रयोगशाळेच्या एका रिपोर्टने या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे. रिपोर्टमधून असे समोर आले आहे की, हत्येपूर्वी साक्षीसोबत शारीरिक संबंध ठेवले गेले होते. म्हणजे हत्या झाली त्याच्या काही वेळ आधी तरुणीसोबत सेक्स केला गेला होता.
वाचा >> Crime : इंस्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बलात्कार अन्…, अल्पवयीन मुलीसोबत भयानक घटना
रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, मुलीच्या योनीत मिळालेल्या नमुन्यानुसार हत्या करणाऱ्या साहिलचा या शारीरिक संबंधाशी संबंध नाही. त्यामुळे पोलिसांसमोर असा प्रश्न निर्माण झाला आहे की, हत्येपूर्वी तिच्यासोबत कुणी शारीरिक संबंध ठेवले. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले गेले की सहमतीने, असा प्रश्नही आता या रिपोर्टनंतर निर्माण झाला आहे.
वाचा >> धक्कादायक! नर्सशी संबंध ठेवताना रूग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रातही याचा उल्लेख केला आहे. वेगळी बाजू समोर आल्याने हत्या प्रकरणाचा तपास आता आणखी व्यापक बनला आहे. तरुणीच्या शरीरात जे डीएनएचे नमुने मिळाले आहेत, ते साहिलच्या डीएनएसोबत जुळत नसल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
POCSO, SCST कायद्यातील कलमान्वये गुन्हा
पोलिसांनी आता त्या मुलाचा शोध सुरू केला आहे, जो गेले अनेक दिवसांपासून साक्षीसोबत होता. त्याच मुलामुळे साहिलने चिडून हत्या केली होती. पोलिसांकडे अजून मुलीवर अत्याचार झाल्याची कोणतीही तक्रार आलेली नाही. पोलिसांनी न्यायालयात 640 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे.
48 तासानंतर साहिलला करण्यात आली होती अटक
28 मे रोजी साक्षीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी साहिलला 48 तासांनंतर बुलंदशहरातून अटक केली होती. सध्या तो तुरुंगात असून, हत्या करण्यात आलेल्या मुलीशी संबंध ठेवणारा कोण होता? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
ADVERTISEMENT