शिंदे गटाच्या आमदाराच्या कारचा भीषण अपघात, युवक जागीच ठार

मुंबई तक

• 01:21 PM • 04 Mar 2024

शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारने एका युवकाला उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुरुडजवळ असलेल्या टोलनाक्यावर झाला असून चालकाविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 mahendra dalvi car accident

mahendra dalvi car accident

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिंदे गटाच्या आमदाराच्या कारने युवकाला उडवले

point

आमदाराच्या कारच्या धडकेत युवक जागीच ठार

Car Accident: राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला तर दुसरीकडे शिंदे गटातील अनेक नेते वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत आहे. शिंदे गटाचे अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) हे ही आता त्यांच्या कार अपघातामुळे (Car Accident) चर्चेत आले आहेत. आमदार महेंद्र दळवी यांच्या कारने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्यांच्या ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  हा अपघात मुरुड तालुक्यातील उसडीजवळ घडला आहे.

हे वाचलं का?

चालकाविरोधात गुन्हा

अलिबागमधील शिंदे गटाचे आमदार असलेले महेंद्र दळवी यांच्या कारने दुचाकीस्वाराला उडवल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मुरुडजवळ असलेल्या टोलनाक्यावर झाला  होता. या प्रकरणी आता ड्रायव्ह धनेश सणकर याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा>> 'वंचित'चे तीन उमेदवार ठरले? आंबेडकरांनी केला खुलासा

वाहनांचे प्रचंड नुकसान

आमदार महेंद्र दळवी यांच्या कारने उडवलेल्या युवकाचे नाव जासीम अब्दुल रहेमान पासवारे आहे. कारची धडक इतकी जोरात होती की, त्याचा जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. 

तरुणाचा जागीच मृत्यू

अपघातानंतर युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरुणाच्या मृत्यूमुळे आमदार महेंद्र दळवी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

    follow whatsapp