‘भांडणात अंडकोष पिळणे हत्येचा प्रयत्न नाही’, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई तक

• 04:34 PM • 27 Jun 2023

भांडणाच्या वेळी एखाद्या पुरुषाचे अंडकोष पिळणे किंवा दाबणे याला ‘हत्येचा प्रयत्न’ (Attempt to Murder) म्हणता येणार नाही, असा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. ट्रायल कोर्टाच्या निकालाविरूद्ध हा निर्णय देण्यात आला आहे. ज्यामध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीला दोषी ठरवण्यात आले होते.

mumbaitak

mumbaitak

follow google news

भांडणाच्या वेळी एखाद्या पुरुषाचे अंडकोष पिळणे किंवा दाबणे याला ‘हत्येचा प्रयत्न’ (Attempt to Murder) म्हणता येणार नाही, असा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने (karnataka high court दिला आहे. ट्रायल कोर्टाच्या निकालाविरूद्ध हा निर्णय देण्यात आला आहे. ज्यामध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीला दोषी ठरवण्यात आले होते. आरोपीचा पीडितेचा खून करण्याचा कोणताही उद्देश नव्हता आणि ही दुखापत मारामारीतून झाल्याचे उच्च न्यायालयाने अधोरेखित करत आरोपीच्या तुरुंगवासाची शिक्षा सात वर्षांवरून तीन वर्षांवर आणली आहे. या निकालाची आता सर्वंत्र चर्चा रंगली आहे. (squeezing testicles during fight is not attempt to murder karnataka high court decision)

हे वाचलं का?

आरोपी आणि तक्रारदार यांच्यात भांडणे झाली होती. या भांडणा दरम्यान आरोपीने तक्रारदाराचे अंडकोष पिळले होते. पण ”आरोपीने खुनाच्या हेतूने हे कृत्ये केल्याचे म्हणता येणार नाही”. तसेच ”आरोपीने हत्येची तयारी केली असती किंवा हत्येचा प्रयत्न केला असता तर त्याने खून करण्यासाठी काही घातक शस्त्रे आणली असती,” असे निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाने (karnataka high court नोंदवले होते. तसेच जरी दुखापतीमुळे पीडितेचा मृत्यू झाला असला तरी हत्येचा हेतू नव्हता, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.

हे ही वाचा : Crime : पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय, पतीनं केलं अत्यंत भयंकर कृत्य

ट्रायल कोर्टाच्या आदेशाचे प्रतिध्वनी करत उच्च न्यायालयाने म्हटले की, ”जरी त्याने (आरोपीने) अंडकोष निवडले, जे शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि जखमींना ते काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली, तर ही एक गंभीर दुखापत आहे.पण याला आरोपीने कोणत्याही हेतूने किंवा तयारीने हत्येचा प्रयत्न केला असे म्हणता येणार नाही, असे माझे मत असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले. आरोपीने केलेली दुखापत भारतीय दंड संहितेच्या कलम 324 अंतर्गत आणली जाऊ शकते. शरीराचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या खाजगी भागाला पिळून गंभीर दुखापत करणे” असे देखील न्यायमूर्ती के नटराजन यांनी निकालात म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

गावच्या जत्रेतील ‘नरसिंहस्वामी’ मिरवणुकीत पीडित नाचत होता. या दरम्यान आरोपी परमेश्वरप्पा मोटारसाय़कलवरून घटनास्थळी पोहोचला होता. यावेळी पीडित आणि आरोपी परमेश्वरप्पा यांच्यात भांडण झाली होती. ही घटना 2010 साली घडली होती. हे प्रकरण कोर्टात गेल्यावर 2012 साली ट्रायल कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले होते.

भांडणादरम्यान आरोपीने पीडितेचे अंडकोष पिळले, त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आणि खटला दाखल केला. त्यानंतर, चिक्कमगलुरू जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या परमेश्वरप्पा आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेत शिक्षेविरुद्ध अपील करत ट्रायल कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले होते. या प्रकरणात आता कर्नाटक उच्च न्यायालयाने भांडणाच्या वेळी एखाद्या पुरुषाचे अंडकोष पिळणे किंवा दाबणे याला ‘हत्येचा प्रयत्न’ (Attempt to Murder) म्हणता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत आरोपी दोषी नसल्याची कबुली दिली.

हे ही वाचा : धक्कादायक! मित्रानेच चिरला मित्राचाच गळा, अन् हैवानासारखा रक्तही प्यायला!

दरम्यान ट्रायल कोर्टाच्या आदेशानुसार, आरोपीला कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत सात वर्षांचा तुरुंगवास, कलम 341 (चुकीचा संयम) अन्वये एक महिना तुरुंगवास आणि कलम 504 (अपमान करणे) अंतर्गत एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण कर्नाटक उच्च न्यायालयाने आता सात वर्षांची शिक्षा आता तीन वर्षांवर आणली आहे. या निकालाची आता सर्वंत्र चर्चा रंगली आहे.

    follow whatsapp