Thane Murder : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा (Mumbara Crime) येथून गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता असलेल्या 18 वर्षीय तरुणाचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह (dead body) सापडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरु आहे. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी मुंब्य्रातील ज्युबली पार्क परिसरातील झुडपामध्ये काही नागरिकांना हा मृतदेह दिसून आला होता. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.
ADVERTISEMENT
मृतदेहाशेजारी दगड आणि कात्री
बेपत्ता युवकाच्या मृतदेह सापडल्यानंत पोलिसांनी सांगितले की, नागरिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सापडलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतदेहाची पाहणी करुन युवकाची हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला होता, त्याठिकाणी एक दगड आणि कात्री सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा >> 2000 मुली, 6 मसाज पार्लर, अय्याशीत जगलेला सेक्स किंग, आता भोगतोय…
मामाला भेटायला गेला अन्…
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, मृत तरुणाचे नाव आवेश शेख असून तो मुंब्र्यातील अमृतनगर परिसरात राहणारा होता. तो ज्युबली पार्क परिसरात राहणाऱ्या त्याच्या मामाला तो भेटायला जात होता. मात्र आवेश शेख हा 14 नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करुन तपासकार्याला सुरुवात केली आहे.
आरोपीपर्यंत पोहचण्याचे आव्हान
आवेश शेखचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत सापडला असल्याने त्याची हत्या का करण्यात आली आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासाठी आता वेगवेगळ्या मार्गाने या हत्येचा तपास केला जात असून आवेशच्या मोबाईलवरूनही आरोपीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT