UP Rape Case : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एका तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्कूटर शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिला रिक्षात ओढून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्काराची ही घटना गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटी पोलीस स्टेशन परिसरात 30 नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडली. (UP Crime young woman learning to ride a scooter suddenly 3 boys kidnapped her by rickshaw and did gang rape)
ADVERTISEMENT
पीडित तरूणी जेव्हा स्कूटर चालवायला शिकत होती, तेव्हा तिची मैत्रिण आणि मैत्रिणीचा बॉयफ्रेंडही घटनास्थळी हजर होते. माहितीनुसार, जेव्हा पीडितेच्या मैत्रिणीने आणि मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने आरोपींना विरोध केला तेव्हा त्यांनी त्यांनाही ओलीस ठेवले.
वाचा: Rohit Pawar : अजित पवारांशीच पंगा! रोहित पवार म्हणाले, “टीका मी पचवून घेईन, पण…”
गँगरेपच्या या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना आरोपींबाबत काही सुगावाही लागला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, हे घृणास्पद कृत्य करणारे तीन आरोपी होते.
पीडितेसोबत नेमकं घडलं तरी काय?
एफआयआरनुसार, पीडित तरूणी 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.35 च्या सुमारास कारखान्यातून परतत होती. यावेळी पीडिता तिच्या मैत्रिणीसोबत खानापूरला जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर स्कूटर चालवायला लागली. यावेळी, तिला फोन आल्यावर ती थांबून बोलू लागली. तिने मागे वळून पाहिले तर मागे तीन तरुण उभे होते.
वाचा: Crime : पत्नीच्या हत्येची 6 लाखांत दिली सुपारी, पण पतीचाच झाला ‘गेम’!
या तिन्ही मुलांनी पीडिता, तिची मैत्रिण आणि मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडवर चुकीचे आरोप केले. यानंतर सर्व आरोपींनी पीडितेला बळजबरीने झुडपात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
घटना घडल्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. यानंतर पीडित तरूणी आणि तिच्या मैत्रिणींनी घरी पोहोचून संपूर्ण घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबाच्या वतीने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT