UP Crime: उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यामध्ये (Baliya UP) एक खळबळजनक घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गाजवळ एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. रस्त्याजवळ फेकलेल्या ट्रॉली बॅगमध्ये 15 ते 16 वर्षाच्या मुलीचे तुकडे (Body parts) पोलिसांना मिळाले आहेत. या घटनेमुळे बलिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ट्रॉली बॅगमधील (Trolley Bag) मृतदेहाचे तुकडे पुढील तपासणीसाठी पाठवले असून तपास वेगाने सुरु करण्यात आला आहे. मुलीच्या मृतदेहाच्या तुकड्यांची तपासणी करण्यासाठी आता पोलिसांनी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण केले आहे.(up murder body parts found in trolley bag what is the real case)
ADVERTISEMENT
प्रकरणाचे गूढ वाढले
मुलीच्या शरीराचे तुकडे असलेली ट्रॉली बॅग रस्त्याशेजारी फेकण्यात आली होते. मात्र शरीराचे ते तुकडे कुजले असल्याने ते ओळखणेही कठीण झाले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी सोनभद्र-चांदौली सीमाभागातही याच प्रकारचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणाचे आणखी गूढ वाढले आहे, त्या प्रकरणाचाही अजून उलघडा झालेला नाही.
हे ही वाचा >> Crime : 22 दिवसांनी होते तरुणीचे लग्न, मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबली अन्…
श्रद्धा हत्याकांडची आठवण
ही घटना उघडकीस आली ती बलियाच्या दया छपरा आणि प्रसाद चपरा यांच्यामुळे. राष्ट्रीय महामार्ग एनएच 31 पासून जवळच असलेल्या शेतामध्ये लाल रंगाची पडलेली ट्रॉली बॅग या दोघांना दिसली होती. त्यानंतरच ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्या ट्रॉली बॅगमध्ये काय आहे पाहण्यासाठी ते जवळ गेले असता ट्रॉली बॅगमधून दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ट्रॉली बॅग ताब्यात घेतली असून ते दृश्य पाहून अनेकांना दिल्लीत घडलेल्या श्रद्धा हत्याकांडची आठवण झाली.
मृतदेह स्त्रीचा की पुरुषाचा
ट्रॉली बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये फाटक्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेहाचे तुकडे आढळून आले. मात्र ते पाहणाऱ्या लोकांना मृतदेहाचे तुकडे हे पुरुषाचे आहेत की महिलेचे ते त्यांना कळून आले नाही.
तुकडे रस्त्याशेजारी फेकले
पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर परिसरातील नागरिकांना हा मृतदेह याच परिसरातीलच असल्याची शंका व्यक्त केली आहे. या परिसरातील कोणीतरी हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते राष्ट्रीय महामार्गावर फेकून दिले असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही ट्रॉली बॅग झुडपामध्ये टाकण्यात आली होती, मात्र भटक्या प्राण्यांनी ती ट्रॉली बॅग ओढून शेतात आणली असणार असं पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा >> “अख्खे कुटुंब याच वावरात पुरेन”, भाजप आमदार सुरेश धसांच्या पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा
ओळख पटणे अवघड
पोलीस अधीक्षक ए आनंद यांनी तपासावेळी सांगितले की, या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. सध्या त्या ट्रॉली बॅगमध्ये फक्त शरीराचे तुकडे मिळाले आहेत. त्यामुळे हा मृतदेह पुरुषाचा आहे की, स्त्रीचा ते पाहणे हेच एक आव्हान आहे. तसेच मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बिहारमधीलही काही ठिकाणीही तपास सुरु करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT