Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशमधून (Uttar pradesh) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बापानेच (Father) पोटच्या पोराचा गळा घोटळ्याची घटना घडली आहे. क्षु्ल्लक कारणावरून बाप आणि मुलामध्ये वाद झाला होता. या वादातून बापाने मोबाईल चार्जरच्या वायरने मुलाचा गळा घोटून हत्या केली आहे. दिपक असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर बापाने पळ काढला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (uttar pradesh crime story father killed her son switch off tv world cup match crime news)
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना 19 नोव्हेंबरची आहे. 19 नोव्हेंबरला मुलाचे वडिल आरोपी गणेश प्रसाद घरात बसूव वर्ल्ड कपचा फायनल सामना पाहत होता. यावेळी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये ही फायनल लढत सुरु होती. ही फायनल सुरू असताना मुलगा दिपक घरी आला होता.
हे ही वाचा : Exclusive: मुख्यमंत्र्यांनी ‘ती’ चूक केली? छगन भुजबळ म्हणाले, ‘ते’ माझे बॉस..
घरात पाय ठेवताच दिपकने वडिल गणेश प्रसाद यांना जेवण बनवायला सांगितले. पण गणेश प्रसादने मुलाच काही एक ऐकले नाही आणि ते मॅचच बघत राहिले. वडिल अजून जेवण बनवण्यासाठी उठले नसल्याचे पाहून दिपकला राग आला आणि त्याने थेट टीव्हीच बंद केला.
सामना रंगात असताना मुलगा दिपकने टीव्ही बंद केल्याने गणेश प्रसाद चांगलेच संतापले. आणि मुलगा आणि बापामध्ये शाब्दीक वाद सुरु झाला. हा वाद पुढे आणखीणच वाढला आणि पुढे गणेश प्रसाद यांनी मोबाईल चार्जरच्या वायरने गळा घोटून मुलगा दिपकची हत्या केली. या हत्येनंतर गणेश प्रसाज यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. पण कानपूर पोलिसांनी सोमवारी त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपकचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या घराबाहेरील पायऱ्यांवर पडला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे, आणि पुढील तपास सुरु आहे.
हे ही वाचा : IPL Auction 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा 2 भारतीय क्रिकेटपटूंना झटका! दाखवला बाहेरचा रस्ता
चकेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त बृजनारायण सिंह यांनी हत्येसाठी मोबाईल चार्जरचा वापर केल्याची माहिती देण्यात आली. तसेच दिपकचा मृतदेह पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे. तसेच पिता पुत्र दारु पिऊन नेहमी भांडंत असायची. या भांडणातून मुलाची हत्या झाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत.
ADVERTISEMENT