Ganpat Gaikwad : उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) व राहुल पाटील (Rahul Patil) या दोघांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये महेश गायकवाड व राहुल पाटील हे दोघं गंभीर जखमी झाले आहे. त्याच्यावर सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर काही वेळात तो गोळीबार करत असल्याचा गणपत गायकवाडांचा तो व्हिडीओही व्हायरल झाला. मात्र त्यानंतर आता ही घटना चालू असताना पोलीस स्टेशनबाहेर नेमकं काय घडत होतं त्या घटनेचाही व्हिडीओही (Video Viral) आता समोर आला आहे. त्यामुळे आता या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
मुलाला धक्काबुक्की
आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आमि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्यानंतर होय मी गोळीबार केला असं सांगत त्यांनी ‘पोलीस ठाण्यामध्येच माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेवर या लोकांनी जबरदस्तीने कब्जा केला होता. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्टेशनबाहेर नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्या सारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे. मी स्वत: गोळी झाडली. मला काही पश्चात्ताप नाही. कारण माझ्या मुलांना पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर मारत असतील तर मग मी काय करणार? असा सवाल त्यांनी केला होता. त्यानंतर आता पोलीस स्टेशनबाहेरचाही व्हिडीओ समोर आल्याने आता आणखी या घटनेची चर्चा होऊ लागली आहे.
गर्दी आणि धक्काबुक्की
उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमधील जो व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्येही त्यांच्या मुलाला धक्काबुक्की केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्या व्हिडीओमध्ये पोलिसांबरोबरच इतर लोकांचीही तिथं गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
धक्काबुक्कीचा व्हिडीओ समोर
त्यामध्ये काही जण वैभव गायकवाड यांना आत ढकलत आहेत. तर त्याचवेळी पोलिसही त्यांना काही तरी सांगत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे काल जिथे गोळीबार करण्यात आला त्याचवेळी गणपत गायकवाड यांच्या मुलाला धक्काबुक्की केली जात आहे.त्यावेळी त्यांना आताही ढकलून घालण्यात आले व काही क्षणानंतर ते बाहेर येत निघून गेल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
ADVERTISEMENT