Yashashree Shinde Case Update : (दिपेश त्रिपाठी, नवी मुंबई) २० वर्षीय यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी फरार असलेल्या दाऊद शेखला ताब्यात घेतले. दाऊद शेख यानेच यशश्रीची हत्या केल्याचे आता पोलिसांनी स्पष्ट केले आहे. चौकशी त्याने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली असून, हत्येचा कारणाबद्दल पोलिसांनी मोठा खुलासा केला. (Why Dawood Shaikh killed Yashashree Shinde)
ADVERTISEMENT
दाऊद शेख याला पकडल्यानंतर नवी पोलीस गुन्हा शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पोलीस अधिकारी दीपक साकोरे म्हणाले, "आम्ही नातेवाईक आणि इतरांची चौकशी करून दोन-तीन संशयित निश्चित केले होते. त्या करिता पथके नवी मुंबई आणि कर्नाटकमध्ये पाठवण्यात आले होते. दोन पथके कर्नाटकात तळ ठोकून होते. आम्हाला इथे जी माहिती मिळत होती, ती आम्ही तिथल्या पथकांना देत होतो."
दाऊद शेख कुठे लपलेला होता?
"आम्ही आज सकाळी (30 जुलै) मुख्य संशयित आरोपी दाऊद शेख याला ताब्यात घेतले आहे. घटना घडल्यानंतर त्यांचा ठिकाणा आम्हाला सापडत नव्हता. तो कर्नाटकचा आहे, एवढी माहिती फक्त होती. त्यानंतर त्याच्या घरी, नातेवाईकांकडे चौकशी केली. त्यानंतर त्याच्या मित्राने आम्हाला काही माहिती दिली. त्याआधारे आम्ही कर्नाटकातील शहापूर तालुक्यात एक गाव आहे अलूर म्हणून तिथून आम्ही आरोपीला ताब्यात घेतले.
हेही वाचा >> 'या' ठिकाणी पडलेला होता यशश्रीचा मृतदेह, ऑन द स्पॉट रिपोर्ट
"मोहसिन हा मयताच्या (यशश्री शिंदे) संपर्कात होता. त्या मुलीच्या संपर्कात जे होते, त्या सर्वांची आम्ही चौकशी करत होतो. कुठलीही गोष्टी आम्हाला सोडायची नव्हती. तीन चार जणांवर आमचा संशय होता. आम्ही ज्या संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली, दाऊद शेख याने हत्येची कबूली दिली आहे. यात दुसरा कुठलाही संशयित नाहीये.
यशश्री शिंदेची हत्या करण्याचे कारण काय?
या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस अधिकारी दीपक साकोरे म्हणाले, "मयत (यशश्री शिंदे) आणि दाऊद शेख यांची ओळख होती. मैत्री होती. मागील तीन-चार वर्ष यशश्री शिंदे या मुलाच्या संपर्कात नव्हती. असं वाटतंय की, त्यातूनच त्याने हे केले आहे.अजून पूर्ण चौकशी झालेली नाही."
हेही वाचा >> "आज अजित पवारांनी केलं, उद्या दहशतवादी असं करतील"
यशश्री शिंदेच्या चेहरा विद्रुप कुणी केला? या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस अधिकारी म्हणाले, "जी माहिती आतापर्यंत मिळालेली आहे. पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्टरांसोबत चर्चा झालेली आहे. त्या आधारे भोसकण्यात आले आहे. चेहऱा कुत्र्यांनी विद्रुप केल्याची शक्यता आहे. पोस्टमार्टेम रिपोर्ट आज मिळेल. त्यानंतर ते स्पष्ट होईल."
ADVERTISEMENT