Yashashree shinde news in marathi : उरणच्या गल्लीबोळात 20 वर्षीय यशश्री शिंदेच्या हत्येने संतापाच्या लाटा उसळत आहेत. 25 जुलै रोजी बेपत्ता झालेल्या यशश्रीचा 26 जुलै रोजी मध्यरात्री एका पेट्रोल पंपाजवळील झाडाझुडपात मृतदेह सापडला. यशश्रीच्या हत्येप्रकरणात दाऊद शेख प्रमुख आरोपी आहे. या घटनेनंतर दाऊदने यशश्रीचा किती छळ केला याची माहिती समोर आली आहे. (Yashshree Shinde was raped by Dawood Sheikh)
ADVERTISEMENT
20 वर्षीय यशश्री शिंदे वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत होती. त्याचबरोबर ती बेलापूर येथील एका खासगी कंपनीत काम करत होती. 25 जुलै रोजी ती घराबाहेर पडली. त्यानंतर तिचा संपर्कच तुटला. मोबाईल बंद लागत होता. त्यामुळे कुटुंबियांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि यशश्रीचा शोध सुरू झाला.
यशश्रीचा शोध घेत असताना पोलिसांना आला कॉल
25 जुलै रोजी रात्री यशश्रीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री उरण पोलीस ठाण्याच्या एक पथकाला कॉल आला. त्या कॉलनंतर पोलिसांनी कोटनाका परिसरातील घटनास्थळाकडे धाव घेतली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता यशश्रीचा मृतदेह
पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना दिसले की, एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. मृतदेहावर असंख्य जखमा झालेल्या होत्या. कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत होते. कुत्र्यांनी मुलीचा चेहराही लचके तोडून विद्रूप केला होता. खांद्यावरील मांसही कुत्र्यांनी खाल्लं होतं.
हेही वाचा >> UPSC कोचिंग सेंटरमध्ये 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, घटना घडली कशी?
कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर चाकूचे वार केलेले होते. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी यशश्रीच्या आईवडिलांना बोलवण्यात आले. यशश्रीचे कपडे आणि तिच्या अंगावरील टॅटूवरून तिची ओळख पटली. तिच्या हत्येप्रकरणी आईवडिलांनी दाऊद शेखचे नाव घेतले. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला.
15व्या वर्षी यशश्रीवर दाऊदने केला होते अत्याचार
दाऊद शेखविरुद्ध गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर दाऊद शेखने यशश्रीवर यापूर्वी अत्याचार केल्याची माहिती समोर आली.
दाऊद शेख हा ड्रायव्हर आहे. 2018 मध्ये त्याने 15 मध्ये यशश्री शिंदेला बघितले. त्यानंतर तिला टार्गेट करणं सुरू केले. दाऊद शेखने तिला जाळ्यात ओढले. 2019 मध्ये दाऊदने यशश्रीवर अत्याचार केले. या प्रकरणी तिच्या कुटुंबियानी तक्रार केल्यानंतर पॉक्सोतंर्गत गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा >> "राष्ट्रवादीकडून पाठीत वार करण्याचे काम सुरू", महायुतीत संघर्ष
पोलिसांनी त्याला अटक केली होती. तो तुरुंगात होता. तुरुंगातून सुटल्यानंतर दाऊद शेखने पुन्हा यशश्रीचा पाठलाग सुरू केला होता. दाऊद तिला कॉल करायचा. त्यानंतर 26 जुलै रोजी यशश्री शिंदेचा मृतदेहच सापडला.
ADVERTISEMENT