Extra Marital Affair : देशात अनैतिक संबंधांच्या (Extra Marital Affair) घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये अनैंतिक संबंधांमध्ये अडसर ठरत असलेल्या पतीचा (Husband) पत्नीने बॉयफ्रेंडसह (Boyfriend) मिळून काटा काढला आहे. पोलिसांना या घटनेची उकल करण्यात यश आले असून आरोपी पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची उकल होताच संपुर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे. (wife and her boyfriend end husband after he saw in bedroom life extra marital story)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय…
थुलेहडी गावात राहणाऱ्या राजेशचे लग्न झाले होते. दोघांचा सुखी संसार सुरु होता. मात्र या संसारात एका तिसऱ्याची एंन्ट्री झाली होती. राजेशच्या पत्नीचे गावच्याच नान्हू महताब सोबत प्रेमसंबंध (Extra Marital Affair) होते. 30 मार्चला पत्नी आणि नान्हू महताब या दोघांनी मिळून राजेशला दारू पाजली होती. यानंतर जास्त नशा झाल्याने राजेश झोपून गेला होता. याच संधीचा फायदा घेऊन पत्नी आणि नान्हू महताबने राजेशच्याच घरी शारीरीक संबंध ठेवायला सुरूवात केली. या दरम्यानच राजेशला जाग आली आणि त्याने पत्नीला नान्हू महताबसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. ही घटना पाहून त्याला मोठा धक्का बसला आणि त्याने विरोध करायला सुरुवात केली.
हे ही वाचा : आई शप्पथ! अंपायरने दिला ‘नो बॉल’, त्याने चाकूने भोकसले; मैदानावर घडला थरार; मैदानावर घडला थरार
पत्नीचं फुटलं बिंग
राजेशने त्याच्याच घरात पत्नीला नान्हू महताब सोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने त्याचा पारा चढला आणि त्याने दोघांना जाब विचारण्यात सुरुवात केली.या दरम्यान पत्नीला आणि नान्हूला आपलं बिंग फुटल्याचे कळताच दोघांनी मिळून राजेशचा काटा काढण्याचा निर्णय़ घेतला. त्यानुसार दोघांनी राजेशचा गळा आवळून त्याची हत्या केली. या घटनेनंतर राजेशचा मृतदेह अज्ञातस्थळी फेकून दिला होता.
असा झाला हत्येचा उलगडा
पोलिसांना (Police) अज्ञातस्थळावरून राजेशचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.या पोस्टमार्टम अहवालात मृत्यूचे खास असे कारण समोर आले नव्हते. त्यामुळे त्यांनी कुटूंबियांची चौकशी करायला सुरुवात केली होती. या चौकशीत त्यांना राजेशच्या पत्नीवर संशय बळावला होता. यावेळी पत्नीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिने संपूर्ण गुन्ह्याची उकल केली.
हे ही वाचा : मन सुन्न करणारी घटना! पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच झोपला पती…
पत्नीला आणि महताबला राजेशने नको त्या अवस्थेत पाहिलं होते. यानंतर त्याने दोघांच्या नात्याला विरोध दर्शवला होता.या विऱोधानंतर पत्नी आणि महताबने या दोघांनी मिळून राजेशचा गळा दाबून हत्या केली.सध्या या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) रायबरेलीमध्ये ही घटना घडली आहे.या घटनेने संपुर्ण गावं हादरलं आहे.
ADVERTISEMENT