Crime news in marathi : पाटण्यातील फुलवारी शरीफमध्ये झालेल्या उत्तर प्रदेशातील बदायूं येथील तरुणाच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू, सासरा आणि पत्नीने मिळून तरुणाचा गळा आवळून खून केला. मृताची पत्नी अस्मारी खातून उर्फ मंजू देवी हिने यापूर्वी दोनदा लग्न केले होते. मृत सुभाष प्रजापतीच्या भावाचे म्हणणे आहे की, त्याच्या वहिनीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध होते आणि तिला चौथ्यांदा लग्न करायचे होते.
ADVERTISEMENT
सुभाष याचा विरोध करायचा. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, मयत हा अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला होता. त्यामुळे त्याचे पत्नीसोबत अनेकदा भांडणं होत होती. यातूनच त्याची हत्या करण्यात आली. कुटुंबीयांनी सांगितले की, सुभाष प्रजापती यांचा दोन वर्षांपूर्वी फुलवारी शरीफ भुसौला दानापूर येथील अस्मेरी खातून हिच्याशी विवाह झाला होता.
अस्मारी खातून यांचे यापूर्वी दोनदा लग्न झाले होते. दोन्ही पतींना सोडल्यानंतर असगरीने दोन वर्षांपूर्वी सुभाष प्रजापती याच्याशी तिसरे लग्न केले होते. मृताचा भाऊ ब्रिजेश प्रजापतीने सांगितले की, असगरी खातूनने सुभाषसोबत लग्न केले. असगरी खातून हिला दोन पतीपासून दोन मुले आहेत.
महिलेला चौथ्यांदा करायचे होते लग्न
सुभाष प्रजापतीचा भाऊ ब्रिजेश प्रजापतीने सांगितले की, सुभाषची पत्नी अजमेरी खातून हिचे दुसऱ्या मुलासोबत अवैध संबंध होते. सुभाष याच्यानंतर त्याची पत्नी अजमेरी खातूनला चौथ्यांदा त्या मुलासोबत लग्न करायचं होतं. याची माहिती सुभाष प्रजापती यालाही मिळाली होती.
याची माहिती सुभाष यांना मिळताच त्याने पत्नी अजमेरी खातून यांना विरोध केला. या विरोधामुळे पत्नी अजमेरी खातून, सासू अख्तारी खातून आणि सासरे मोहम्मद अलाउद्दीन यांनी मिळून जावयाचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशय आला अन्…
फुलवारी शरीफ पोलीस ठाण्याचे प्रभारी सफिर आलम यांनी सांगितले की, शुक्रवारी सुभाष प्रजापती याचा मृतदेह शेतात सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना मृताच्या मानेवर खुणा आढळल्या. त्यानंतर त्यांनी तपासाचा दिशा बदलली. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर सुभाषची हत्या झाल्याचेही समोर आले. सुभाषचा त्याच्या सासरच्या परिसरात मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सासरच्या मंडळींची कडक चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
ADVERTISEMENT