छोट्या भावावर वडिलांचा जास्तच जीव, संतापातून मोठ्या भावाने…, कुटुंब हादरलं

मुंबई तक

28 Sep 2023 (अपडेटेड: 28 Sep 2023, 03:03 PM)

लहान भाऊ आजारी असल्यामुळे वडिल सगळे पैसे त्याच्यावरच खर्च करतात. या रागातून मोठ्या भावाने लहान भावावर गोळी झाडली. त्यामध्ये आजारी असलेल्या भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Elder brother shoots younger brother dead because father spends more money on younger brother's treatment

Elder brother shoots younger brother dead because father spends more money on younger brother's treatment

follow google news

UP Murder case : उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कानपूरमध्येही (UP Kanpur) अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मोठ्या भावाने लहान भावाची हत्या (Brother Murder) केली आहे. त्याचे कारण ऐकल्यानंतर मात्र मोठी खळबळ उडाली आहे. भावाने हत्या केल्यानंतर मात्र वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनीच या घटनेचा उलघडला केला आहे. पोलिसांनी आरजूला अटक केल्यानंतर भाऊ अदनानची हत्या का केली हे सांगितले आहे. माझ्या लहान भावावर उपाचार सुरु होते, ते उपचार करण्यासाठी कुटुंबाकडून प्रचंड पैसा खर्च केला जात होता. त्याचा राग मनात होता, म्हणूनच माझ्या भावाची गोळी झाडून हत्या केल्याचे त्याच्या मोठ्या भावाने सांगितले. भावाने हे कारण सांगितल्यानंतर मात्र अनेकांना धक्का बसला आहे. (younger brother sick Elder brother shot dead incident kanpur uttar pradesh)

हे वाचलं का?

आजारपणात लाखो रुपये खर्च

आरजूने आपला आपला भाऊ आदनाना गोळी घालून ठार केले होते. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले. पोलिसांनी सांगितले की, आदनानच्या शिक्षणावर आणि त्याच्या आजारपणावर प्रचंड पैसा खर्च केला जात होता. त्याच्या आजारपणात लाखो रुपये खर्च झाले होते. त्यामुळे आरजूकडून खर्च करण्यास विरोध केला जात होता. तो आजारी असतानाच त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रवेशानंतर त्याला काही पैशाची गरज होती, म्हणून त्याने पैसे मागितले त्यावेळी कुटुंबीयांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याने विनंती करुनही पैसा दिला गेला नाही.

हे ही वाचा >> Pune : ‘मुलाचं निधन झालंय, डीजे वाजवू नका’, 21 जणांनी अवघ्या कुटुंबाला केली बेदम मारहाण

तंत्र मंत्रावर खर्च

डॉक्टरांच्या उपचारानंतरही आदनानची तब्बेत बरी झाली नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी देवाच्या तंत्र मंत्रावर खर्च करण्यास सुरुवात केली. देवाच्या तंत्रमंत्रावर त्यांनी लाखो रुपये खर्च केले होते. त्याचा आरजूला राग होता. खर्च करुनही भावाला बरे वाटत नाही म्हणून त्याने अनेकदा घरच्याबरोबर वाद घातला होता. त्यावेळी त्याच्यावर खर्च करु नका तो बरा होणार नाही असं आरजून वडिलांना सांगितले तरीही वडिलांनी त्याचे ऐकले नाही तो राग त्याच्या मनात होता.

हे ही वाचा >> Mathura Train Video : दारूची नशा, व्हिडिओ कॉल…, लोकल थेट चढली प्लॅटफॉर्मवरच

झोपलेल्या जागीच संपवलं

आदनान मंदिराच्या टेरेसवर झोपला होता. त्यावेळी आरजूने टेरेसवर जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो घराबाहेर पडून गेला. मात्र तोपर्यंत या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केरण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांचाही भावावर संशय बळावला, आणि 12 तासानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने सारा घडलेला प्रकार सांगितला.

 

    follow whatsapp