Ajit Pawar on Sharad Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर अजित पवारांकडून केल्या जाणाऱ्या विधानांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवारांना सातत्याने लक्ष्य करत असलेल्या अजित पवारांनी दोन दिवसांत वेगवेगळी विधाने केली असून, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत अजित पवारांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे अजित पवारांचे सूर नरमले का? अजित पवारांची भाषा बदललीये का? अशी चर्चा जोरात सुरू झाली आहे. ()
ADVERTISEMENT
जुन्नर तालुक्यातील केंदूर येथे झालेल्या सभेत अजित पवार शरद पवारांबद्दल काय बोलले ते वाचा
"मी काही निर्णय घेतले. मधल्या काळात आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना विनंती केली. तुम्ही ८० वर्षाच्या पुढे गेला आहात. ८४ वर्षे झालेत. आम्ही चांगले काम करू. दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह आम्ही अनेक वर्ष राज्य चालवले आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. साहेबांनी मला सांगितलं की, "ठीक आहे अजित. मी आता राजीनामा देतो. मलाही आता सगळं कुणावर तरी सोपवायचं आहे. तुम्ही सगळे हे चालवा.मी म्हणालो की, साहेब हा तुमचा निर्णय आहे."
हेही वाचा >> महाराष्ट्रातील दहा खासदारांना तिकीटं न देण्याची 'ही' आहेत
"मित्रानों, मला काहींनी सांगितलं. तुमचं साहेबांवर प्रेम आहे. तुम्हाला असं वाटतं की, दादांनी (अजित पवार) या वयात पवार साहेबांना सोडायला नको होतं. मी सोडतच नव्हतो. मी म्हणत होतो की, तुम्ही घरी बसा. तुम्ही तब्येतीला सांभाळा. आम्हाला मार्गदर्शन करा. कुठं चुकलं तर कानाला धरा."
"साहेब म्हणाले घ्यायचं नाही"
"कुठं काही सूचवायचं असेल, तर सूचवा. जसं मी ३०-३२ वर्षे तुमचं ऐकत आलोय. तुम्ही म्हणाल ते करत आलोय. २००४ ला मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळत होतं. तरी साहेब म्हणाले घ्यायचं नाही. साहेबांनी सांगितलं आता भाजपसोबत जायचं. जायचं. आता शिवसेनेबरोबर जायचं. जायचं. आता काँग्रेसला सोडायचं, सोडलं. सोनिया गांधी परकीय व्यक्ती आहे असा मुद्दा काढला. हे सगळं तुमच्यासमोर आहे."
"काही लोक म्हणतात, अजित पवारांना साहेबांनी संधी दिली. अरे, हो ना... साहेबांना पण चव्हाण साहेबांनी संधी दिली. इथे बसलेल्या तुमच्यातील बसणाऱ्या प्रत्येकाला कुणीतरी संधी दिली आहे. मी माझ्या राजकीय आयुष्यात अनेकांना आमदार केलं. खासदार केलं. कोल्हेंना मी पक्षात घेतलं. मी उमेदवारी दिली. निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक केला. पाच वर्ष त्यांनी लोकांशी संपर्कच ठेवला नाही."
हेही वाचा >> "जयंत पाटलांनी ठाकरेंना सांगितलं की...", शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट
"चव्हाण साहेबांनी संधी देऊनही पवार साहेबांनी ११ वर्षातच सोडलं. काय वाटलं असेल, चव्हाण साहेबांना? चव्हाण साहेब नंतर इतके खचले की, १९८४ ला त्यांचं निधन झालं. आमचं अख्ख घराणं शेतकरी कामगार पक्षाचं होतं. चव्हाण साहेबांनी तरी त्यांना तिकीट दिलं. संधी दिल्यामुळे पवार साहेब इथपर्यंत पोहोचले. आम्हालाही संधी मिळाली. संधी एकदाच मिळते, नंतर तुम्हाला तुमचं काम करावं लागतं."
"मी मुलगा नाही म्हणून मला संधी नाही"
"मी ३०-३२ वर्षात कधीही शब्द मोडला नाही. पण, मी पण आता साठीच्या पुढे गेलो. किती दिवस? आम्हाला काही चान्स आहे की नाही. आम्ही काही चुकीचं वागतो का? भावनिक होऊ नका. नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे. केंदूरकरांनो, मी जर साहेबांचा (शरद पवार) मुलगा असतो, तर मला संधी मिळाली असती की नाही? मिळालीच असती. फक्त मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी नाही. हा कसला न्याय? आम्ही दिवसरात्र काम केलं. पूर्ण जिल्हा सांभाळला. साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती. जिल्हा बँक इतरांच्या हातात असायची. मी राजकारणात आल्यापासून... १९९१ पासून आजपर्यंत ताब्यात ठेवली आहे."
ADVERTISEMENT