Satta Bazar on Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे यशस्वीरीत्या पार पाडले आहे. आता शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार आहे. तत्पुर्वीच लोकसभा निवडणुकीच्या निकालासंबंधीत अनेक अंदाज समोर येऊ लागले आहे. त्यानुसार आता भाजप (BJP) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) सहज जिंकेल, पण त्यांना 400 पारचा टप्पा गाठता येणार नाही, असा अंदाज सट्टाबाजाराने व्यक्त केला आहे. (betting market prediction on lok sabha election 2024 bjp congres nda india alliance rahul gandhi pm narendra modi)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज जाणून घेण्यासाठी आजतक आणि इंडिया टूडेने सट्टाबाजारातील मुंबईतील टॉप बुकींशी बातचित केली. यामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सहज विजय मिळण्याची शक्यता सट्टा बाजाराने व्यक्त केली आहे. दरम्यान भाजपने लोकसभा निवडणुकीत 400 पार जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे यावर बुकींच म्हणणं काय आहे? तेही जाणून घेऊयात.
हे ही वाचा : Ravindra Dhangekar : धंगेकर रस्त्यावर, पण टार्गेट कोण? समजून घ्या अर्थ
भाजप 'इतक्या' जागा जिंकणार
पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी म्हणजे सुरुवातीला भाजपसाठी मतांची संख्या जास्त होती. मात्र तीन टप्प्यातील मतदानानंतर भाजपची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप 295 ते 305 जागा जिंकण्याचा अंदाज मुंबईतील टॉप बुकींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईतील टॉप बुकींनुसार भाजपला 400 जागा गाठता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. तर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 55 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मुंबईतील टॉप बुकींच्या अंदाजानुसार, मतदानापूर्वी सुरुवातीला सट्टेबाजीने भाजपला 315 ते 325 तर काँग्रेसला 45 ते 55 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र तीन टप्प्यातील मतदानानंतर भाजपची घसरण झाली आहे. त्यावेळी भाजपला 270 ते 280 जागा मिळण्याचा अंदाज होता. तर काँग्रेस 70 ते 80 जागांच्या दिशेने चांगली वाढ दर्शवत होती. मात्र आता पुन्हा 6 टप्प्यातील मतदानानंतर परिस्थिती बदलली आहे. सट्टेबाजारातील बुकींनी आता भाजप 295 ते 305 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काँग्रेसला 55 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा : Pune Accident प्रकरणात तीन जणांना अटक, आमदार सुनील टिंगरे गायब?
एका बुकीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सट्टा बाजाराने कधीही 400 पार घोषणेचे समर्थन केले नाही. सट्टेबाजीच्या बाजारभावानुसार 350 जागा देखील शक्य नाहीत."
'या' राज्यात कोणाला किती जागा मिळणार?
महाराष्ट्र : एनडीए आघाडीला 28 जागा
उत्तर प्रदेश : एनडीएला आघाडीला 64 ते 66 जागा
गुजरात : तिसऱ्यांदा क्लीन स्वीप होईल
ADVERTISEMENT