Exit Polls 2024 Updates : देशात सातव्या टप्प्यातील मतदार आज पार पडतेय. हे मतदान संध्याकाळी संपताच लगेचच एक्झिट पोलचे आकडे समोर येणार आहेत. या आकड्यावर 2024 च्या लोकसभेचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) नेमका कसा लागणार आहे. याचा एक कयास बांधता येणार आहे. तत्पुर्वी 2014 च्या लोकसभेपासून ते यंदाच्या 2024 लोकसभेपर्यंत म्हणजेच, गेल्या 10 वर्षात एक्झिट पोल (Exit Poll 2024) किती अचूक ठरले होते? हे जाणून घेऊयात. (exit poll 2024 lok sabha election 2014 to 2024 how much exit poll change in last 10 year pm narendra modi and congress rahul gandhi)
ADVERTISEMENT
देशात 2014 मध्ये नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रात सत्तेत आलं होतं. यावेळी निवडणुकीच्या आधी आलेला एक्झिट पोल पाहुयात. इंडिया टूडे अॅक्सिसने एनडीएला 339-365 जागा आणि युपीएला 77-108 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. न्यूज 24 टूडेस चाणक्यने एनडीएला 350 जागा आणि युपीएला 95 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. न्यूज 18 आयपीएसओएसने एनडीएला 336 जागा आणि युपीएला 82 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. टाईन्म नाऊ व्हिएमारने एनडीएला 306 आणि युपीएला132 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला. इंडिया टीव्ही सीएनएक्सने एनडीएला 300 ते युपीएला120 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता.
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : जयंत पाटील शरद पवारांना सोडणार?
Exit Poll agency | NDA | UPA |
India Today-Axis | 339-365 | 77-108 |
News 24-Today's Chanakya | 350 | 95 |
News18-IPSOS | 336 | 82 |
Times Now VMR | 306 | 132 |
India TV-CNX | 300 | 120 |
Result | 353 | 99 |
एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर भाजपने निकालात 353 जागा जिंकून बहूमत मिळवत केंद्रात सरकार स्थापण केले होतं. तर युपीएला अवघ्या 93 जागाच आल्या होत्या.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलवरती एक नजर टाकूयात. इंडीया टूडेच्या अंदाजानूसार एनडीएला 272 आणि युपीएला 115 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. न्यूज 24 चाणक्यच्या अंदाजानुसार एनडीएला 340 आणि युपीएला 101 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सीएनएन आयबीएन-सीएसडीएसने एनडीएला 280 आणि युपीएला 97 जागांचा अंदाज व्यक्त केला होता. टाईम्स नाऊ ओआरजीने एनडीएला 249 आणि युपीएला 148 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. एबीपी न्यूज निलसनन एनडीएला 274 आणि युपीएला 97 जागांचा अंदाज वर्तवला होता. एनडीव्ही हन्सा रिसर्चने एनडीएला 279 आणि युपीएला 103 जागांचा अंदाज बांधला होता.
Exit Poll agency | NDA | UPA |
India Today-Cicero | 272 | 115 |
News 24-Chanakya | 340 | 101 |
CNN IBN-CSDS | 280 | 97 |
Times Now ORG | 249 | 148 |
ABP News-Nielsen | 274 | 97 |
NDTV-Hansa Research | 279 | 103 |
Result | 336 | 60 |
या एक्झिट पोलनंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला 336 जागा मिळाल्या होत्या. तर युपीएला अवघ्या 60 जागा आल्या होत्या.
हे ही वाचा : 'महाराष्ट्र BJP चा सगळा खेळ बिघडवेल', कोणी सांगितला नेमका आकडा?
आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल काही तासात समोर येणार आहे. या एक्झिट पोलमध्ये नेमके काय आकडे समोर येतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
ADVERTISEMENT