Imtiyaz Jaleel Criticize Navneet Rana : इसरार चिश्ती, औरंगाबाद : एमआयएमचे नेते असदुद्दीने ओवेसी आणि अमरावतीच्या भाजप उमेदवार यांच्यात शाब्दीक वाद पेटला असतानाच, आता या वादात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे. इम्तियाज जलील
(Imtiyaz Jaleel) यांनी नवनीत राणांवर बोचरी टीका केली आहे. 'नवनीत राणा (Navneet Rana) ही चीप मेंटलिटीची बाई आहे. दहा मिनिटे कॅमेरासमोर तिला दाखवलात तर ती एकटी नाचेल. अशा चिल्लर लोकांना इतकं महत्व देऊ नका', अशी टीका जलील यांनी नवनीत राणांवर केली आहे. (imtiyaz jaleel criticize navneet rana amaravati lok sabha bjp candidate asaduddin owaisi)
ADVERTISEMENT
इम्तियाज जलील माध्यमांशी बोलत होते. यावेळी जलील म्हणाले की, यांची लढाई रस्त्यावर पाहायची बाकी होती, ती माझी मनोकामना देखील पुर्ण झाली. तसेच यांची भांडणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली होतायत. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे काय करताय? हे पाहण्याची आता वेळ आली आहे, असे जलील यांनी म्हटले. तसेच ही लढाई बॅलेटची नसून दांड्यांची आहे. आणखी दोन दिवसानंतर पहा काय काय होतं, कुणा कोणाची ऑफिस फुटतात, कुणाकुणाच्या गाड्या फुटतात यांची सर्व तयारी आहे, असे जलील यांनी म्हटले.
हे ही वाचा : तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल अजितदादांवर का तुटून पडले?
नवनीत राणांवर टीका करताना जलील यांचा तोल सुटला. ''तुम्ही या चिल्लर लोकांना एवढं महत्त्व का देता, माझ्या नजरेत ती (नवनीत राणा) अतिशय चीप मेंटलिटीची बाई आहे. प्रसिद्धीसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकते, पब्लिसिटीसाठी मंदिरात न जाता उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसाचं पठण करते. असं कोणत्या धर्मात लिहलंय? तिला तुम्ही दहा मिनिटे कॅमेरासमोर तुला दाखवतो म्हटल्यावर ती दहा मिनिटे एकटी नाचेल. तसेच तिला इथं बोलावलं म्हणजे भाजपाला कोणीतरी भूकणार हवंय, म्हणून अमरावती वरून हे पार्सल आणलंय, अशी टीका इम्तियाज जलील यांनी नवनीत राणांवर केली.
तसेच तुम्ही दारूचे दुकान उघडले म्हणून दारूच्या बाटल्या दाखवल्या. निवडणुकीच चिन्ह दारूच्या बाटल्या ठेवायला पाहिजे होती. प्रचाराला दोनशे दोनशे रुपयांमध्ये आले होते हे मलाही माहित आहे, बिचारे दोनशे रुपये घेऊन प्रचाराला येणाऱ्या लोकांना दोनशे रुपयात घोषणा द्यायची म्हणून आणले होते मात्र त्यांना हे माहीत नव्हते की दोनशे रुपये दांडे पण खावे लागतील, असा टोला इम्तियाज जलील यांनी विरोधकांना लगावला.
ADVERTISEMENT